Lokmat Money > बिझनेस न्यूज > रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करत गेला, भारत स्वत:चेच नुकसान करून बसला

रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करत गेला, भारत स्वत:चेच नुकसान करून बसला

रशियाला गरज होती, यामुळे भारताने आपली कच्च्या तेलाची तहान भागविण्यासाठी स्वस्तात मिळणारे रशियाचे तेल खरेदी केले. देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती मात्र कमी केल्याच नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 05:23 PM2023-04-27T17:23:33+5:302023-04-27T17:24:25+5:30

रशियाला गरज होती, यामुळे भारताने आपली कच्च्या तेलाची तहान भागविण्यासाठी स्वस्तात मिळणारे रशियाचे तेल खरेदी केले. देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती मात्र कमी केल्याच नाहीत.

India went on buying cheap crude oil from Russia, at its own loss in tread loss | रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करत गेला, भारत स्वत:चेच नुकसान करून बसला

रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करत गेला, भारत स्वत:चेच नुकसान करून बसला

युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर कमालीचे वाढले होते, तेव्हा रशियाकडे खरेदीदार नव्हते. रशियाला गरज होती, यामुळे भारताने आपली कच्च्या तेलाची तहान भागविण्यासाठी स्वस्तात मिळणारे रशियाचे तेल खरेदी केले. देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती मात्र कमी केल्याच नाहीत. परंतू रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे भारताला तोट्याचा सौदा ठरला आहे. 

भारताची रशियासोबतची व्यापार तूट सात पटीने वाढून $34.79 अब्ज झाली आहे. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था स्थिर राहण्यासाठी व्यापार संतुलन असणे गरजेचे असते. म्हणजेच दोन्ही देशांमध्ये आयात निर्यातीचे प्रमाण हे समसमान किंवा त्याच्या आसपास असायला हवे. रशिया असो की अमेरिका दोन्ही देशांत व्यापार हा डॉलरमध्येच होतो. यामुळे व्यापार तूट वाढली तर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. 

रशियासोबतच्या व्यापारी तूटीला भारताने केलेली कच्च्या तेलाची बंपर आयात आहे. भारताची व्यापार तूट ही विक्रमी 101.02 अब्ज डॉलरवर गेली आहे. ही वेळ पहिल्यांदाच आली आहे. निर्यातीपेक्षा जेव्हा अधिक आयात केली जाते तेव्हा त्याला व्यापार तूट म्हटले जाते. म्हणजेच भारत रशियाला कमी वस्तू विकत आहे. 

महत्वाचे म्हणजे भारताची व्यापार तूट ही आधीच चीनसोबत सर्वाधिक आहे. भारत इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक, खेळणी आदी वस्तू या मोठ्या प्रमाणावर चीनकडून आयात करतो. त्या बदल्यात चीन मात्र भारताकडून कमी वस्तू घेतो. आता यात रशियाचाही समावेश झाला आहे. 
युक्रेन युद्धापूर्वी भारत ६० टक्क्यांपेक्षा अधिक तेल आखाती देशांकडून घेत होता. तर रशियाकडून फक्त गरजेच्या १ टक्केच तेल घेत होता. परंतू आता रशिया भारताचा सर्वात मोठा सप्लायर झाला आहे. भारताने चीनपेक्षाही जास्त तेल रशियाकडून खरेदी केले आहे. याचबरोबर रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे घेतो. हा वाटा भारताच्या शस्त्रास्त्र आयातीच्या ४५ टक्के आहे. 

भारत रशियाचा काय देतो...
भारत रशियाला अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स संबंधित वस्तू, कृषी उत्पादने आणि फार्मास्युटिकल्स उत्पादने मोठ्या प्रमाणावर देतो. याबरोबर चहा आणि कॉफीदेखील पुरवितो. परंतू, कच्चे तेल आणि शस्त्रास्त्रांच्या बदल्यात या वस्तूंची किंमत खूपच कमी होत आहे. 

Web Title: India went on buying cheap crude oil from Russia, at its own loss in tread loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.