Join us

भारताला बनवणार ग्लोबल 'एआय हब', काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 11:39 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन कंपन्यांना देशात गुंतवणूक करण्याचं आवाहन

अमेरिका दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी आयटी उद्योगातील अनेक दिग्गजांची भेट घेत त्यांना भारतात गुंतवणुकीचं आवाहन केलं. अर्थ मंत्रालयानं यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केलीये. अर्थमंत्र्यांनी देशात खासगी क्षेत्राच्या संशोधन, विकास व नवोन्मेष योजनांमधून निर्माण होणाऱ्या संभाव्य संधीबाबत माहिती दिली. एआय कौशल्य प्रवेशामध्ये भारत जागतिक पातळीवर पहिल्या स्थानी आहे, असं त्यांनी सांगितल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय.

एआय मिशनची प्रशंसा

'गूगल क्लाऊड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) थॉमस कुरियन आणि त्यांच्या टीमसोबत द्विपक्षीय बैठकीदरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांना प्रादेशिक सहकार्यासाठी भारतात स्थानिक संबंध शोधण्यास आणि 'मेक इन इंडिया' उपक्रमाअंतर्गत भारत व जागतिक बाजारासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहन केलं.

₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?

कुरियन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मिशनची तसेच या क्षेत्रातील प्रगतीची प्रशंसा केली. त्यांनी भूमी आणि सागरी पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारताला जागतिक नेटवर्कशी जोडण्याच्या गरजेवरही भर दिला.

भारताचे सार्वभौम मॉडेल जगासाठी मार्गदर्शक

'ट्युरिंग'चे सीईओ जोनाथन सिद्धार्थ यांच्यासोबत बैठकीत अर्थमंत्र्यांनी भारताच्या एआय धोरणासंबंधी बाबींची माहिती दिली. सिद्धार्थ यांनी भारतीयांच्या योगदानातून एक सार्वभौम मॉडेल पुढे आल्यास ते जगासाठी मार्गदर्शक ठरेल असंही मत मांडलं.

टॅग्स :निर्मला सीतारामनआर्टिफिशिअल इंटेलिजन्स