Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्वस्त कच्च्या तेलाचा लाभ भारत उठविणार

स्वस्त कच्च्या तेलाचा लाभ भारत उठविणार

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे निर्माण झालेल्या स्वस्ताईचा लाभ घेऊन आपले ‘रणनीतिक पेट्रोलियम साठे’ (एसपीआर) वाढविण्याची तयारी भारताने चालविली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:36 AM2020-03-18T05:36:55+5:302020-03-18T05:37:14+5:30

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे निर्माण झालेल्या स्वस्ताईचा लाभ घेऊन आपले ‘रणनीतिक पेट्रोलियम साठे’ (एसपीआर) वाढविण्याची तयारी भारताने चालविली आहे.

India will benefit from cheap crude oil | स्वस्त कच्च्या तेलाचा लाभ भारत उठविणार

स्वस्त कच्च्या तेलाचा लाभ भारत उठविणार

नवी दिल्ली : सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे निर्माण झालेल्या स्वस्ताईचा लाभ घेऊन आपले ‘रणनीतिक पेट्रोलियम साठे’ (एसपीआर) वाढविण्याची तयारी भारताने चालविली आहे.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील पेट्रोलियम पदार्थांची मागणी मार्चमध्ये ४0 टक्क्यांनी घसरली आहे. तेल उत्पादक व पुरवठादार देशांनी तेल उत्पादनात कपात करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, रशियाने त्यास खो घातला. त्यामुळे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचा पुरवठा वाढतच आहे. त्याचा परिणाम म्हणून किमतीत मोठी घसरण झाली आहे.
ओपेकमधील आघाडीचे तेल उत्पादक सौदी अरेबिया आणि अबुधाबी यांनी उत्पादन वाढवून किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. एका वरिष्ठ माहीतगार अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्यासाठी, तसेच त्यांच्यासाठी (अबुधाबी नॅशनल आॅइल कंपनी व सौदी अ‍ॅरॅमको) नवे तेल करार करून एसपीआर वाढविण्याची मोठी संधी आहे.
दुसºया एका अधिकाºयाने सांगितले की, तेलसाठे भरण्याकरिता ८ ते ९ तेल वाहकांची खरेदी करता यावी, यासाठी ४८ ते ५0 अब्ज रुपये अदा करण्याची मागणी तेल मंत्रालयाने वित्त मंत्रालयास एक पत्र लिहून केली आहे. या मुद्द्यावर इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हज लि. (आयएसपीआरएल), तसेच तेल व वित्त ही मंत्रालये यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. एडीएनओसी आणि सौदी अ‍ॅरॅमको यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

भारत हा जगातील तिसºया क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे. आपल्या गरजेपैकी ८0 टक्के तेल भारताकडून आयात केले जाते. भारताने दक्षिण भारतातील तीन ठिकाणी रणनीतिक तेलसाठे निर्माण केले आहेत. यात ३६.८७ दशलक्ष बॅरल अथवा ५ दशलक्ष टन तेलाची साठवणूक करता येते. पुरवठा विस्कळीत झाल्यास यातील तेल वापरले जाते.

Web Title: India will benefit from cheap crude oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.