वॉशिंग्टन : २0१६मध्ये विदेशात राहणाऱ्या भारतीयांकडून भारतात पाठविण्यात येणाऱ्या मनीआॅर्डरच्या (रेमिटन्स) रकमेत पाच टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता आहे. मनीआॅर्डरमार्फत एकूण रक्कम ६५.५ अब्ज डॉलर राहण्याची शक्यता आहे. २0१५मध्ये विदेशातून पाठविण्यात येणाऱ्या पैशांच्या बाबतीत भारत जगात आघाडीवर होता.
जागतिक बँकेच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जागतिक बँकेने म्हटले की, मनीआॅर्डरचा स्रोत असलेल्या देशांत मंदीचा प्रभाव आहे. अर्थव्यवस्था धीमी झाली असतानाच कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण झाली आहे. त्यामुळे मनीआॅर्डरचे प्रमाण घसरले आहे. मनीआॅर्डरचे प्रमाण घटले असले तरी मनीआॅर्डरच्या बाबतीत भारत आजही जगात पहिल्या क्रमांकावरच आहे. भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात विदेशात काम करीत आहेत. त्यामुळे विदेशातून येणाऱ्या पैशांचा ओघही इतर कोणाही देशाच्या तुलनेत जास्त आहे.
जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले की, २0१६ मध्ये भारतात ६५.५ अब्ज डॉलर विदेशातून पाठविले जातील, असा अंदाज आहे. चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये विदेशातून ६५.२ अब्ज डॉलर मनीआॅर्डरच्या माध्यमातून येऊ शकतात. पाकिस्तान पाचव्या स्थानी आहे. पाकमध्ये २0.३ अब्ज डॉलर मनीआॅर्डरद्वारे येऊ शकतात.
जागतिक बँकेने केलेल्या अभ्यासानुसार, दक्षिण आशियात येणाऱ्या मनीआॅर्डरमध्ये २0१६ मध्ये २.३ टक्के घट होऊ शकते. २0१५ मध्ये विदेशात काम करणाऱ्या नागरिकांनी भारतात ६९ अब्ज डॉलर पाठविले होते. जगातील कोणत्याही देशाला एवढी मनीआॅर्डर मिळाली नाही. (वृत्तसंस्था)
भारताला मनीआॅर्डरद्वारे मिळणारी रक्कम ५ टक्के घटणार
भारतात पाठविण्यात येणाऱ्या मनीआॅर्डरच्या (रेमिटन्स) रकमेत पाच टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता आहे.
By admin | Published: October 8, 2016 03:52 AM2016-10-08T03:52:58+5:302016-10-08T03:52:58+5:30