Join us

अमेरिका, चीनला मागे टाकत FDI मध्ये भारत जगात पहिला

By admin | Published: September 30, 2015 9:45 AM

परकीय गुंतवणुकदारांचा कल आता भारताकडे वळला असून २०१५ मधील पहिल्या सहा महिन्यांमध्ये भारतात तब्बल ३१ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३० -  परकीय गुंतवणुकदारांचा कल आता भारताकडे वळला असून २०१५ मधील पहिल्या सहा महिन्यांमध्ये भारतात तब्बल ३१ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे. विशेष बाब म्हणजे परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत जगभरात भारताचा पहिला नंबर आला असून अमेरिका, चीन यासारख्या देशांनाही भारताने मागे टाकले आहे. 

विदेशातील एका इंग्रजी प्रसारमाध्यमाने २०१५ मध्ये जगभरातील देशांमध्ये झालेल्या परकीय गुंतवणुकीचा अभ्यास करत अहवाल तयार केला आहे. या अहवालात जगभरात सर्वाधिक परकीय गुंतवणूक भारतात झाल्याचे म्हटले आहे. २०१५ मधील पहिल्या सहा महिन्यात भारतात ३१ अब्ज डॉलर्स, चीनमध्ये २८ तर अमेरिकेत २७ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाल्याचे यामध्ये म्हटले आहे.  मे २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने परकीय गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे.ट

डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या मोहीमेतून भारताकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मोदी सरकारने केले  आहे. त्यामुळे  या अहवालावरुन मोदी सरकारला आणखी एक प्रमाणपत्रच मिळाले आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारला आणखी ब-याच क्षेत्रात सुधारणा करावी लागणार आहे.