Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, सरकारी बँक करणार मेगा ई-लिलाव!

स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, सरकारी बँक करणार मेगा ई-लिलाव!

mega e auction : रेसिडेंशिअल, कमर्शिअल आणि इंडस्ट्रिअल सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीचा समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 11:11 AM2022-11-11T11:11:31+5:302022-11-11T11:13:54+5:30

mega e auction : रेसिडेंशिअल, कमर्शिअल आणि इंडस्ट्रिअल सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीचा समावेश आहे.

indian bank mega e auction on 15 and 16 november 2022 check here all details | स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, सरकारी बँक करणार मेगा ई-लिलाव!

स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, सरकारी बँक करणार मेगा ई-लिलाव!

नवी दिल्ली : जर तुम्ही स्वस्त घर किंवा कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. देशातील सरकारी बँका तुम्हाला ही खास संधी देत ​​आहेत. बँक ऑफ बडोदा  (Bank Of Baroda) आणि इंडियन बँककडून (Indian Bank) तुम्हाला स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. यामध्ये रेसिडेंशिअल, कमर्शिअल आणि इंडस्ट्रिअल सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीचा समावेश आहे.

याबाबतची माहिती IBAPI (Indian Banks Auctions Morgaged Properties Information) द्वारे देण्यात आली आहे. इंडियन बँकेनेही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. इंडियन बँकेने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुमच्या स्वप्नातील प्रॉपर्टी थोड्याच अंतरावर आहे. तुम्ही इंडियन बँकेच्या मेगा लिलावात सहभागी होऊ शकता. हा ई-लिलाव 15 आणि 16 नोव्हेंबर 2022 रोजी केला जाईल.

पॉपर्टीच्या लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही https://ibapi.in/Sale_Info_Home_ib.aspx या लिंकला भेट देऊ शकता. याशिवाय 30 नोव्हेंबर रोजी बँक ऑफ बडोदाद्वारे मेगा ई-लिलाव आयोजित करण्यात येणार आहे.

कोणत्या प्रॉपर्टीचा बँक करते लिलाव
देशातील सर्व बँका वेळोवेळी प्रॉपर्टीचा लिलाव करत असतात. बँकेच्या वतीने ई-लिलावात एनपीएच्या यादीत आलेल्या प्रॉपर्टीची विक्री केली जाते. म्हणजेच ज्या प्रॉपर्टीवर त्यांच्या मालकांनी कर्ज घेतल्यानंतर बँकेची थकबाकी भरली नाही. बँक अशा लोकांच्या प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेऊन तिचा लिलाव करते.

ई-लिलावात प्रॉपर्टी खरेदीचे फायदे...
- याद्वारे तुम्हाला क्लिअर टायटलची सुविधा मिळेल.
- खरेदीदाराला प्रॉपर्टीचा तात्काळ ताबा दिला जाईल.
- बँक खरेदीदाराला कर्जाची सुविधा देखील सहज देऊ शकते.

Web Title: indian bank mega e auction on 15 and 16 november 2022 check here all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.