नवी दिल्ली : भारतीय बँकांमधील कुकर्ज वाढतच असून, त्यामुळे बँकांना २० लाख कोटी रुपयांचा खड्डा पडेल, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात बँका कोसळण्याच्या मार्गावर असतील, असेही त्यांचे म्हणणे आहे.
कोरोना महामारीच्या काळात कंबरडे मोडलेल्या इतर बँकांच्या प्रमुखांप्रमाणेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मात्र पुढील संकेत दिले आहेत. कोरोनामुळे कुकर्ज (एनपीए) मोठ्या प्रमाणावर वाढेल व सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांसाठी पुनर्पुंजीकरणाची योजना आणणे आवश्यक होऊन बसले आहे, असे त्यांनी म्हटले होते.
त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असाही लावण्यात येत आहे की, कोरोनामुळे कर्जफेड करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. लोकांनी ३१ ऑगस्टपर्यंत मोरॅटोरियममुळे कर्ज न फेडल्यामुळे कुकर्ज १२ लाख कोटींच्या जवळ जाईल. कदाचित ते २० लाख कोटीपर्यंतही जाऊ शकेल. म्हणजेच सध्याच्या दुप्पट होईल. तर यापूर्वी माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही कुकर्ज प्रचंड प्रमाणात वाढेल, असे संकेत दिले होते.
भारतासमोर मोठं संकट? ऑक्टोबरमध्ये बहुतांश बँका कोसळणार; तज्ज्ञांकडून धोक्याचा इशारा
ऑक्टोबरमध्ये बँका कोसळण्याच्या मार्गावर?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 04:51 AM2020-08-15T04:51:30+5:302020-08-15T07:16:16+5:30