Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' भारतीयाने लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसजवळ खरेदी केलं सर्वात महागडं घर, जाणून घ्या किंमत...

'या' भारतीयाने लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसजवळ खरेदी केलं सर्वात महागडं घर, जाणून घ्या किंमत...

Ravi Ruia : रवी रुईया यांनी लंडनमध्ये नवे घर घेतले असून, ते लंडनमधील सर्वात महागडी मालमत्ता म्हणून ओळखले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 06:43 PM2023-07-22T18:43:46+5:302023-07-22T19:04:21+5:30

Ravi Ruia : रवी रुईया यांनी लंडनमध्ये नवे घर घेतले असून, ते लंडनमधील सर्वात महागडी मालमत्ता म्हणून ओळखले जाते.

Indian billionaire Ravi Ruia buys Russian linked London mansion for Rs 1200 crore | 'या' भारतीयाने लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसजवळ खरेदी केलं सर्वात महागडं घर, जाणून घ्या किंमत...

'या' भारतीयाने लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसजवळ खरेदी केलं सर्वात महागडं घर, जाणून घ्या किंमत...

याआधीही तुम्ही लंडनमध्ये अनेकांनी घर खरेदी केल्याचे वाचले असेल. तसे पाहिले तर लंडनमध्ये अनेक भारतीय अब्जाधीशांची घरं आहे. उद्योगपती लक्ष्मी निवास मित्तलपासून अनिल अग्रवालपर्यंत असे अनेक भारतीय अब्जाधीश आधीच लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. यामध्ये आता भारतीय अब्जाधीश रवी रुईया यांचेही नाव जोडले गेले आहे. 

रवी रुईया यांनी लंडनमध्ये नवे घर घेतले असून, ते लंडनमधील सर्वात महागडी मालमत्ता म्हणून ओळखले जाते. या घराची किंमत जवळपास १२०० कोटी रुपये आहे. रवी रुईया यांनी हे घर रशियन मालमत्ता गुंतवणूकदार अँड्री गोंचारेन्को यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती मिळते. रवी रुईया यांनी लंडनच्या १५० पार्क रोड येथे असलेले हॅनोव्हर लॉज मॅन्शन विकत घेतले आहे. या घराचा करार ११३ मिलियन पौंड म्हणजेच १४५ मिलियन डॉलर्समध्ये  करण्यात आला आहे. हॅनोव्हर लॉज लंडनमधील सर्वात महागडी खाजगी निवासी मालमत्ता मानली जाते. 

रवी रुईया यांनी ब्रिटनच्या राजाचा पॅलेस असलेल्या 'बकिंगहॅम'जवळ आपले घर खरेदी केले आहे. लंडनमधील बकिंगहॅम पॅलेस आणि हॅनोव्हर लॉजमधील अंतर जवळपास ५.३१ किलोमीटर आहे. दरम्यान, हॅनोव्हर लॉजची मालकी दोन वर्षांपूर्वीपर्यंत रशियन मालमत्ता गुंतवणूकदार अँड्री गोंचारेन्को यांच्याकडे होती. गोंचरेन्को हे रशियन राज्य ऊर्जा कंपनीची उपकंपनी असलेल्या गॅझप्रॉम इन्व्हेस्ट युगचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी २०१२ मध्ये कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते राजकुमार बागडी यांच्याकडून १२ कोटी युरोमध्ये घेतली होती.

बांधकाम अद्याप सुरू
रवी रुईया यांनी रुईया कार्यालयाच्या माध्यमातून ही मालमत्ता खरेदी केली आहे. रुईया कार्यालयाच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे की, शतकानुशतके जुन्या असलेल्या हॅनोव्हरवर घराचे बांधकाम अद्याप सुरू आहे. यामुळे आलिशान मालमत्तेपेक्षा कमी किमतीत ते मिळत आहे. तरीही हे घर विकत घेणे ही अलीकडच्या काळात लंडनमधील सर्वात मोठी डील आहे.

Web Title: Indian billionaire Ravi Ruia buys Russian linked London mansion for Rs 1200 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.