Lokmat Money > बिझनेस न्यूज > रतन टाटांपासून ते आनंद महिंद्रापर्यंत; 'या' भारतीयांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन रचला इतिहास

रतन टाटांपासून ते आनंद महिंद्रापर्यंत; 'या' भारतीयांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन रचला इतिहास

Indian Businessmen: भारतातील अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांनी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 04:29 PM2023-08-03T16:29:14+5:302023-08-03T16:31:50+5:30

Indian Businessmen: भारतातील अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांनी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठले.

Indian Businessmen: From Ratan Tata to Anand Mahindra, 'These' Indians made history by studying at Harvard University | रतन टाटांपासून ते आनंद महिंद्रापर्यंत; 'या' भारतीयांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन रचला इतिहास

रतन टाटांपासून ते आनंद महिंद्रापर्यंत; 'या' भारतीयांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन रचला इतिहास

Billionaires in India : भारतात असे अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी उद्योग क्षेत्रात मोठे नाव कमावले आणि लाखो-करोडो लोकांसाठी आदर्श बनले. यातील अनेक उद्योगपतींनी अमेरिकेतील प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. हार्वर्ड ही जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. उद्योगपतींपासून कलाकारांपर्यंत, अनेकांनी या विद्यापीठात शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. 

राहुल बजाज


पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि बजाज समूहाचे माजी अध्यक्ष, दिवंगत राहुल बजाज हार्वर्डचे माजी विद्यार्थी होते. 1965 मध्ये बजाजचे नेतृत्व हाती घेतले आणि पाच दशकात बजाजला एका वेगळ्या उंचीव नेऊन ठेवले. सेंट स्टीफन्स कॉलेज, नवी दिल्ली येथून पदवी प्राप्त केल्यानंतर ते हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये एमबीए करण्यासाठी गेले. राहुल बजाज यांनी समूहाचे ऑटो टर्नओव्हर 7.5 कोटी रुपयांवरून 12,000 कोटी रुपयांवर नेले, ज्यामध्ये कंपनीची स्कूटर बजाज चेतकची प्रमुख भूमिका होती. फोर्ब्सच्या मते, 2022 मध्ये त्यांच्या मृत्यूच्या वेळी, राहुल बजाज यांची एकूण संपत्ती $8.2 अब्ज होती.

रतन टाटा


रतन टाटा यांची वेगळी ओलख करुन देण्याची गरज नाही. रतन टाटा भारतातील सर्वाधिक मान असणारे व्यक्ती आहेत. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्चरची पदवी घेतली. टाटा समूहाचा जगभर विस्तार करण्यात रतन टाटा यांची सर्वात मोठी भूमिका होती. टाटा यांना पद्मविभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या उत्पन्नातील सुमारे 60-65 टक्के रक्कम दान केली आहे. बिझनेस टुडेच्या मते, टाटा समूहाचे बाजारमूल्य $26.4 अब्ज आहे. 

आनंद महिंद्रा


आनंद महिंद्रा हे प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात फिल्म मेकिंग आणि आर्किटेक्चरचा अभ्यास केला आणि हार्वर्डमधून एमबीए केले. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती $2.3 अब्ज आहे. त्यांनी आतापर्यंत महिंद्रा समूहात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 

राजकारण्यांनी हार्वर्डमधून पदवी घेतली
माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीही हार्वर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आहे. मद्रास लॉ कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ग्रॅज्युएशन केले. केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनीही हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे. याशिवाय, कपिल सिब्बल यांनी एसटीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एलएलएम पदवी घेण्यासाठी हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला. यांच्याशिवाय अनेक भारतीय आहेत, ज्यांनी हार्वर्डसारख्या विद्यापीठांमधून शिक्षण  घेतल्यानंतर आपले नाव जगभर उंचावले.

Web Title: Indian Businessmen: From Ratan Tata to Anand Mahindra, 'These' Indians made history by studying at Harvard University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.