मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने १० ट्रीलियन डॉलरकडे जात आहे. २०३० पर्यंत हे लक्ष्य पूर्ण होईल. त्यामध्ये जागतिक व्यापार व गुंतवणुकीचा हातभार मोठा असेल, असे मत स्कोच परिषदेत व्यक्त करण्यात आली. स्कोच परिषद ही जगभरातील अर्थव्यवस्थांचा सामाजिक-आर्थिक अभ्यास करणा-या तज्ज्ञ मंडळींची परिषद आहे. अलीकडेच ही परिषद मुंबईत झाली. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या सक्षमतेवर विस्तृत चर्चा करण्यात आली.१५व्या वित्त आयोगाचे सदस्य शक्तिकांता दास हे परिषदेचे अध्यक्ष होते. जी २०, जागतिक व्यापार संघटना आणि जागतिक बँकेसारख्या व्यासपीठांवर भारताचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. यामुळेच जागतिक व्यापार करणारे आणि गुंतवणूक करणारे देश रोज एकेक पाऊस भारताच्या जवळ येऊ पाहात आहेत, असे मत दास यांनी व्यक्त केले.>सकारात्मक प्रतिक्रियानोटाबंदीचा विषय मांडताना दास यांनी भारताचे हे पाऊल जागतिक स्तरावर उल्लेखनीय ठरल्याचे मत मांडले. जागतिक वित्तकारवाई टास्क फोर्स भारताच्या या निर्णयाकडे अत्यंत सकारात्मक, संघटित व सक्रिय दृष्टीने पाहात आहे, असे दास म्हणाले.
भारतीय अर्थव्यवस्था १० ट्रीलियन डॉलरकडे, स्कोच परिषदेतील मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:45 AM