Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशाची अर्थव्यवस्था 55 ट्रिलियन डॉलर्सची होणार; दरडोई उत्पन्न वाढणार, पियुष गोयल यांचा दावा...

देशाची अर्थव्यवस्था 55 ट्रिलियन डॉलर्सची होणार; दरडोई उत्पन्न वाढणार, पियुष गोयल यांचा दावा...

Piyush Goyal: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठा दावा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 09:11 PM2024-08-02T21:11:19+5:302024-08-02T21:12:04+5:30

Piyush Goyal: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठा दावा केला आहे.

Indian Economy: india's economy will be worth 55 trillion dollars; People's income will increase, Piyush Goyal claims | देशाची अर्थव्यवस्था 55 ट्रिलियन डॉलर्सची होणार; दरडोई उत्पन्न वाढणार, पियुष गोयल यांचा दावा...

देशाची अर्थव्यवस्था 55 ट्रिलियन डॉलर्सची होणार; दरडोई उत्पन्न वाढणार, पियुष गोयल यांचा दावा...

Piyush Goyal :भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणे, हे केंद्रातील मोदी सरकारचे लक्ष्य आहे. या दिशेने सरकारकडून सातत्याने पाऊले उचलली जात आहेत. मात्र, आता सरकारने भारताला 55 ट्रिलियन डॉलर्स आणि दरडोई उत्पन्न 33 लाख रुपयांपर्यंत नेण्याचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. हे काम भारताच्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात, म्हणजेच 2047 पर्यंत पूर्ण होण्याचा दावा सरकारकडून केला जातोय.

3 वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ASSOCHAM द्वारे आयोजित कार्यक्रमात सांगितले की, देशाला 2047 पर्यंत विकसित बनवण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. यासाठी अर्थव्यवस्था 55 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचावी लागेल. संरक्षण, इलेक्ट्रिक वाहने, उत्पादन आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन हे लक्ष्य साध्य करायचे आहे. येत्या 3 वर्षात भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. या आकड्यासह आपण जगातील तिसरी सर्वात अर्थव्यवस्था बनू. फक्त चीन आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा मोठी असेल, असा दावा त्यांनी केला. 

सरकारला एकाच वेळी अनेक गोष्टींवर काम करावे लागेल - IMF
या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे कार्यकारी संचालक केव्ही सुब्रमण्यन यांच्या ‘इंडिया@100’ पुस्तकाचे अनावरणही करण्यात आले. सुब्रमण्यम म्हणाले की, काही वर्षांपूर्वी आपण जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पाहत होतो. आज आपल्याला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनायचे आहे. त्यासाठी सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या आघाडीवर काम करावे लागेल. आपल्याला विकास दर 8 टक्के राखायचा आहे. महागाई 5 टक्क्यांच्या वर जाऊ द्यायची नाही. अशा प्रकारे दर 4 वर्षांनी अर्थव्यवस्था दुप्पट होत राहील आणि 2047 पर्यंत 55 ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य गाठू. 

Web Title: Indian Economy: india's economy will be worth 55 trillion dollars; People's income will increase, Piyush Goyal claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.