भारताने जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून असलेले स्थान कायम राखले असून ही गती पुढेही सुरूच राहील, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. नाणेनिधीने भारताचा वृद्धी दर अंदाज ३० आधार अंकांनी अथवा ०.३० टक्क्याने वाढवून ६.८ टक्के केला आहे. याउलट चिनी अर्थव्यवस्थेबाबतच्या चिंता कायम असल्याचे म्हटले आहे.
वित्त वर्ष २०२५-२६ साठीचा भारताचा वृद्धी दर अंदाज नाणेनिधीने ६.५ टक्के इतका कायम ठेवला आहे. नाणेनिधीने ताज्या अहवालात म्हटले आहे की, देशांतर्गत मागणी आणि कामकरी वयाची वाढती लोकसंख्या यामुळे भारताच्या वृद्धी दर अंदाजात वाढ करण्यात आली आहे.
चीनमध्ये नरमाई
२०२४ आणि २०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ३.२ टक्के राहील. चीनचा वृद्धी दर यंदा कमी होऊन ४.६ टक्के राहण्याची शक्यता असल्याचं नाणेनिधीनं म्हटलंय. आगामी वित्त वर्ष २०२५ मध्ये ताे ४.१ टक्के राहील. आधी तो ५.२ टक्के अनुमानित करण्यात आला होता.