Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय अर्थव्यवस्था सावरतेय

भारतीय अर्थव्यवस्था सावरतेय

अर्थव्यवस्था अडचणींतून सावरत असल्याचे व भांडवली गुंतवणूकही वाढत असल्याचे आत्मविश्वासाने सांगताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बळकट

By admin | Published: July 3, 2015 04:21 AM2015-07-03T04:21:31+5:302015-07-03T04:21:31+5:30

अर्थव्यवस्था अडचणींतून सावरत असल्याचे व भांडवली गुंतवणूकही वाढत असल्याचे आत्मविश्वासाने सांगताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बळकट

Indian Economy Reflects | भारतीय अर्थव्यवस्था सावरतेय

भारतीय अर्थव्यवस्था सावरतेय

चेन्नई : अर्थव्यवस्था अडचणींतून सावरत असल्याचे व भांडवली गुंतवणूकही वाढत असल्याचे आत्मविश्वासाने सांगताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बळकट विकासासाठी अधिक सुधारणा व अडकून पडलेले प्रकल्प मोकळे करावे लागतील, असे म्हटले.
बँकेच्या संचालक मंडळाच्या येथे गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना राजन म्हणाले की, ‘जागतिक पातळीवरील कारणांमुळे का असेना नरम पडलेली निर्यात ही काळजीचा विषय आहे तरीही मी म्हणेन की अर्थव्यवस्था गती घेत आहे.’
भांडवली गुंतवणूक वाढत असल्याची काही चिन्हे आम्हाला दिसत आहेत. अडकून पडलेले काही प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची सतत गरज असते व हे काम सरकार करीतही आहे, असे रघुराम राजन यांनी म्हटले. भारतीय अर्थव्यवस्था ही सावरून स्थैर्याकडे जात असल्याच्या प्रक्रियेत आहे. आम्हाला वेगवान विकास हवा आहे का तर त्याचे उत्तर होय असे आहे; परंतु आम्हाला जेथे प्रकल्पांची कोंडी झाली आहे तेथे काम करावे लागेल व विकास हा बळकट व चिरस्थायी असेल अशा सुधारणा कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी भारत ६-८ टक्के विकास दरावर समाधानी नाही व विकासाचा ८-१० टक्के दर गाठण्याचे ध्येय असल्याचे म्हटले होते. चलनवाढ आणि रिझर्व्ह बँकेच्या धोरणावरील त्याचा परिणाम काय या प्रश्नावर उत्तर देताना राजन म्हणाले की, ‘चलनवाढ हा नेहमीच काळजीचा विषय असतो. मान्सूनच्या आघाडीवर आतापर्यंत तरी बातमी चांगली आहे. आम्हाला जे अपेक्षित आहे ते घडत आहे की नाही याकडे आमचे लक्ष आहे. भारताच्या हवामान खात्याने येत्या २-३ महिन्यांत परिस्थिती कमकुवत होईल, असे भाकीत केले आहे; परंतु खासगी पातळीवर असे काही घडणार नाही, असेही भाकीत व्यक्त झाले आहे. भाकीत करणे हे कठीण काम असून, सध्याच्या परिस्थितीत तो गोंधळ बनला आहे, असे राजन म्हणाले.
भारतीय हवामान खात्याने पावसाचा जो अंदाज व्यक्त केला होता त्यापेक्षा जास्त चांगला पाऊस पडला आहे. जून महिन्यात जेवढा पाऊस पडतो त्यापेक्षा २८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याने २ जून रोजी या पावसाळ्यात १२ टक्के कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. निर्यातीच्या प्रश्नावर रघुराम राजन म्हणाले की, ती आघाडी तुलनेने कमकुवत आहे; परंतु अनेक आशियायी देशांमध्येही तसाच अनुुभव आहे.
अपवाद फक्त चीनचा. जागतिक अर्थव्यवस्थेचीच नाजूक परिस्थिती हा मोठा प्रश्न आहे.

जागतिक अर्थव्यवस्था आज कमकुवत असली तरी ती आता सावरण्याच्या वळणावर आहे. त्या अर्थव्यवस्थेची एकूण परिस्थिती ही कोणत्याही अंगाने विचारात घेतली तरी १९३० च्या मंदीच्या जवळपासही नाही, असे राजन यांनी स्पष्ट केले. जागतिक अर्थव्यवस्था ही सावरते आहे हे मी पुन्हा स्पष्ट करू इच्छितो. ते सावरणे खूप काही बळकट नाही. त्याचा वेग मंद आहे, असे राजन यांनी म्हटले. त्यांना जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल त्यांचे मत व अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने कोणती असा प्रश्न विचारण्यात आला होता.

Web Title: Indian Economy Reflects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.