Join us

भारतीय अर्थव्यवस्था ७ ट्रिलियन डॉलरची होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 4:58 AM

भारताची अर्थव्यवस्था या दशकात सात ट्रिलियन डॉलरवर जाईल. तसेच, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट (जीडीपी) सरासरी दहा टक्क्यांच्या आसपास राहील, असे भाकीत डॉईश बँकेने वर्तविले आहे.

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था या दशकात सात ट्रिलियन डॉलरवर जाईल. तसेच, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट (जीडीपी) सरासरी दहा टक्क्यांच्या आसपास राहील, असे भाकीत डॉईश बँकेने वर्तविले आहे.भारतीय अर्थव्यवस्था सध्या मंदीतून जात आहे. मात्र, २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ७ ट्रिलियन डॉलरवर पोहोचेल. केंद्र सरकारने भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. डॉईश बँकेच्या अहवालानुसार अर्थव्यवस्था त्याहून अधिक भक्कम होईल. या दशकामध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अर्थव्यवस्था उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावेल.दिवाळखोरीच्या कायद्यानेदेखील उद्योगामध्ये सकारात्मक संदेश गेला. दरडोई उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ७ ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठेल, असे डॉईश बँकेचा अहवाल सांगतो.>टाटा म्युच्युअल फंडाचा कॉन्ट फंडसमभाग आणि त्याच्याशी संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना मध्यम ते दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने टाटा म्युच्युअल फंडाने ही योजना आणली आहे. सध्या प्रारंभिक आॅफर असल्याने एन्ट्री लोड नाही. मात्र ३६५ दिवसांच्या आत या योजनेमधून बाहेर पडल्यास निव्वळ मालमत्ता मूल्याच्या एक टक्का एक्झिट लोड लागणार आहे. मात्र यापेक्षा नंतर योजनेतून बाहेर पडल्यास कोणताही आकार लागणार नाही. योजनेतील किमान गुंतवणूक ५००० रुपये असून, त्यापुढे एक रुपयाच्या पटीमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.