वॉशिंग्टन : भारतीय अर्थव्यवस्था २0१९ मध्ये ७.५ टक्क्यांनी, तर २0२0 मध्ये ७.७ टक्क्यांनी वाढेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. या दोन वर्षांतील चीनच्या ६.२ टक्के या अनुमानित वृद्धिदराच्या तुलनेत भारताचा वृद्धिदर अत्यंत प्रभावशाली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सोमवारी आपला ‘जानेवारी वर्ल्ड इकॉनॉमी आउटलूक’ हा अहवाल जारी केला. त्यात म्हटले आहे की, २0१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था गतिमान होणार आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सध्या नरमाई असून, महागाई घसरल्यामुळे पतधोरणातील कठोरपणा कमी होण्यास मदत होणार आहे. ेयाचा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला मिळेल.
नाणेनिधीने म्हटले की, अमेरिकेने केलेल्या करवाढीचा परिणाम रोखण्यासाठी काही वित्तीय प्रोत्साहन उपाय चीनने योजले आहेत, तरीही चीनची अर्थव्यवस्था मंदावेल. आवश्यक वित्तीय नियामकीय बंधने आणि अमेरिकेसोबतचा व्यापारी संघर्ष याचा परिणाम चीनवर जाणवणार आहे. अहवालात म्हटले आहे की, उगवत्या आणि विकसनशील आशियातील आर्थिक वृद्धिदर मात्र घसरणार आहे. २0१८ मध्ये ६.५ टक्के असलेला येथील वृद्धिदर २0१९ मध्ये ६.३ टक्के आणि २0२0 मध्ये ६.४ टक्के होईल. २0१७ मध्ये चीनचा वृद्धिदर ६.९ टक्के, तर भारताचा वृद्धिदर ६.७ टक्के होता. २0१८ मध्ये चीनचा वृद्धिदर ६.६ टक्के राहिला; २0१९ आणि २0२0 मध्ये तो ६.२ टक्के राहील. (वृत्तसंस्था)
>ब्रिटनलाही मागे टाकणार!
आधीच्या अंदाजाप्रमाणेच ताजा अंदाज आहे. भारताचा २0१८ मधील वृद्धिदर ७.३ टक्के आहे. २0१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकील, असा अंदाज पीडब्ल्यूसीच्या ‘ग्लोबल इकॉनॉमी वॉच’ या अहवालात एक दिवस आधीच व्यक्त केला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था घेणार झेप; ७.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज
भारतीय अर्थव्यवस्था २0१९ मध्ये ७.५ टक्क्यांनी, तर २0२0 मध्ये ७.७ टक्क्यांनी वाढेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:37 AM2019-01-23T04:37:18+5:302019-01-23T04:37:33+5:30