एकीकडे भारतात बेरोजगारांची संख्याही अधिक आहे, तर दुसरीकडे काम करत असलेल्या लोकांवरही कामाजा बोजा सर्वात जास्त आहे. एशिया-पॅसिफिक रिजनमध्ये (बांगलादेश सोडून) भारतातीलकर्मचारी हे सर्वाधिक काम करत असून त्यांना मिळणारं वेतनही सर्वात कमी असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं (ILO) यासंदर्भातील एक अहवाल तयार केला आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात कर्मतारी सरासरी ४८ तास काम करतात. हे तास जगातील अन्य कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तुलनेत अधिक आहेत. तसंच भारतात केवळ कर्मचारी अधिक वेळ काम करत नाहीत तर त्यांना याच्या मोबदल्यात मिळणारं वेतनही कमी आहे आणि तो चिंतेचा विषय असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
झांबिया-मंगोलिया की श्रेणीत भारत
आकडेवारीनुसार भारतातील कर्मचाऱ्यांवर काम करण्याचा दबाव हा सर्वात जास्त आहे. काम करण्याच्या दबावाच्या श्रेणीत भारत झांबिया, मंगोलिया, मालदिव आणि कतार या देशांच्या श्रेणीत आहे. झांबिया आणि मंगोलिया हे देश गरीब देशांच्या यादीत येतात. जेव्हा भारताची अर्थव्यवस्था ही तेजीनं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत सामील आहे.
सरासरी ११ तास काम
अमेरिकेच्या तुलनेत भारतातील कर्मचारी आठवड्याला सरासरी ११ तास काम करतात. तर दुसरीकडे ब्रिटन आणि इस्रायलच्या तुलनेत भारतीय १२ तास अधिक काम करतात. तर चीनच्या तुलनेत भारतीय हे सरासरी दोन तास अधिक काम करतात.
सर्वात कमी वेतन
जाहीर करण्यात आलेल्या अहवालातील आकडेवारीवरून एक आश्चर्याची बाब समोर आली आहे. जर भारतीयांना अधिक वेळ काम करण्याच्या तुलनेत अधिक वेतन मिळतं अशी जर धारणा असेल तर तीदेखील चुकीची आहे. अधिक काम करत असले तरी भारतीयांना मिळणारं वेतन हे कमी आहे. या अहवालानुसार तज्ज्ञ हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की अधिक काम महत्त्वपूर्ण आहे की चांगलं काम आहे. यात नमूद केल्यानुसार श्रमिक कायदे कठोर असल्यामुळे अनेकदा कंपन्यांना हवं असूनदेखील कमी क्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांना हटवणं त्यांना शक्य होत नाही. यामुळे नव्या नियुक्त्यादेखील कमी होत असतात.
कोणत्या ठिकाणी किती काम?
- अमेरिकेत कर्मचारी आठवड्याला ३७ तास काम करतात.
- ब्रिटनमध्ये कर्मचारी आठवड्याला ३६ तास काम करतात.
- इस्रायलमध्येही कर्मचारी आठवड्याला ३६ तास काम करतात.
- चीनमध्ये कर्मचारी आठवड्याला ४६ तास काम करतात.