वॉशिंग्टन : गरज नसताना महागड्या व घातक औषधांची शिफारस करण्यासाठी डॉक्टरांना लाच देऊन संपूर्ण अमेरिकेत रॅकेट चालविल्याचा आरोप एका औषधी कंपनीच्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश संचालकाविरुद्ध ठेवण्यात आला आहे.जॉन नाथ कपूर (७४), असे आरोपी उद्योगपतींचे नाव असून, गुरुवारी अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यातील घरातून त्यांना अटक करण्यात आली होती. कपूर हे मूळचे भारतातील अमृतसरचे आहेत. कपूर १९६0 साली अमेरिकेला स्थलांतरित झाले होते. सध्या ते इनसीस थेराप्युटिक्स या औषधी कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. सिंथेटिक आॅपियॉइडची अतिरिक्त शिफारस करण्यासाठी डॉक्टरांना लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अमेरिकेच्या बोस्टन प्रांतात डिसेंबर २०१६ मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात यापूर्वी अनेकांवर कारवाई झाली आहे.अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांनी सांगितले की, गेल्या वर्षी २० हजारपेक्षा जास्त अमेरिकी नागरिकांचा सिंथेटिक आॅपियॉइडमुळे मृत्यू झाला होता. लक्षावधी लोकांना या औषधाचे व्यसन लागले आहे. या औषधासाठी विम्याचे पैसे देण्यास अनेक विमा कंपन्या तयार नव्हत्या. आरोपींनी कंपन्यांनाही लाच दिली.
भारतीय वंशियाचा अमेरिकेत घोटाळा, औषधांचे शिफारस प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 5:05 AM