Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत सरकारच्या एका निर्णयामुळे जगभरात खळबळ, तांदळाच्या किमतीने मोडला रेकॉर्ड

भारत सरकारच्या एका निर्णयामुळे जगभरात खळबळ, तांदळाच्या किमतीने मोडला रेकॉर्ड

महागाईला आळा घालण्यासाठी भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 10:18 PM2023-08-28T22:18:46+5:302023-08-28T22:20:12+5:30

महागाईला आळा घालण्यासाठी भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

Indian government imposes conditional curbs on Basmati rice export | भारत सरकारच्या एका निर्णयामुळे जगभरात खळबळ, तांदळाच्या किमतीने मोडला रेकॉर्ड

भारत सरकारच्या एका निर्णयामुळे जगभरात खळबळ, तांदळाच्या किमतीने मोडला रेकॉर्ड


देशातील महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर केंद्राने अटींसह बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. यामुळे देशातील तांदळाचा साठा वाढेल आणि भाव घसरतील, अशी सरकारला आशा आहे. पण, भारत सरकारच्या या पावलामुळे जागतिक बाजारपेठेत तांदळाच्या किमती वधारल्या आहेत. भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने जागतिक बाजारपेठेत तांदळाची किंमत 12 वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याचे बोलले जात आहे.

केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. अशा परिस्थितीत बिगर बासमती तांदळाच्या नावाखाली मोठा घोटाळा होत असल्याचे सरकारला वाटत होते. बासमती तांदळाच्या नावाखाली व्यापारी बिगर बासमतीची निर्यात करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी काही अटींसह बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या पाऊलामुळे बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला ब्रेक लागेल, अशी सरकारला आशा आहे. 

विशेष म्हणजे, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. जागतिक बाजारपेठेत 40 टक्के तांदूळ भारतातून जातो. यामध्ये एकट्या बासमती तांदळाचा वाटा 40 लाख टन आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक देशांमध्ये तांदळाचा मोठा तुटवडा भासणार आहे. यामुळे तांदळाच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
 

Web Title: Indian government imposes conditional curbs on Basmati rice export

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.