Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत सरकारचा इलॉन मस्क यांना धक्का! टेस्लाच्या मोठ्या मागणीला केंद्र सरकारचा विरोध

भारत सरकारचा इलॉन मस्क यांना धक्का! टेस्लाच्या मोठ्या मागणीला केंद्र सरकारचा विरोध

उद्योगपती इलॉन मस्क यांची इलेक्ट्रीक वाहन कंपनी टेस्ला ही भारतात व्यवसाय करण्यास इच्छुक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 02:49 PM2023-12-02T14:49:06+5:302023-12-02T14:51:25+5:30

उद्योगपती इलॉन मस्क यांची इलेक्ट्रीक वाहन कंपनी टेस्ला ही भारतात व्यवसाय करण्यास इच्छुक आहे.

indian government thwarted billionaire elon musk wishes tesla may not gets incentives | भारत सरकारचा इलॉन मस्क यांना धक्का! टेस्लाच्या मोठ्या मागणीला केंद्र सरकारचा विरोध

भारत सरकारचा इलॉन मस्क यांना धक्का! टेस्लाच्या मोठ्या मागणीला केंद्र सरकारचा विरोध

उद्योगपती इलॉन मस्क यांची इलेक्ट्रीक वाहन कंपनी टेस्ला ही भारतात व्यवसाय करण्यास इच्छुक आहे. गेल्या काही दिवसांपासून टेस्लाने प्रशासकीय स्तरावर  तसे प्रयत्नही केले आहेत. यासाठी टेस्ला कंपनीने भारत सरकारकडे काही स्पेशल सूट ची मागमी केली होती, याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. भारत सरकारने टेस्लाची मागणी मान्य केली नसल्याचे समोर असून स्पेशल सूट देण्यास नकार देण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाच्या मागणीवर मंत्रालयात चर्चाही झाली होती, पण टेस्ला कंपनीला कोणताही इंन्सेटीव्ह दिला जाणार नाही. जी कंपनी आपला संपूर्ण व्यवसाय भारतात आणेल त्याच कंपनीला भारत सरकार विशेष सूट देईल, असंही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

टाटांच्या 'या' कंपनीचं अस्तित्व संपुष्टात येणार, मर्जर प्रस्तावाला NCLT ची मंजुरी

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,  भारत सरकार कधीही इलेक्ट्रीक वाहनांवर विशेष सूट देणार नाही. जी कंपनी आपला संपूर्ण व्यवसाय भारतात आणेल त्याच कंपनीला विशेष सूट दिली जाऊ शकते. टेस्लाने विशेष सूटची मागणी केली होती पण सरकारने विशेष सूट देण्याचा निर्णय घेतलेला नाही. 

मस्क यांनी केली होती मागणी

उद्योगपती इलॉन मस्क यांनी २०२१ मध्ये भारतात इलेक्ट्रीक वाहनांवरील आयात शुल्कात विशेष सूट मागितली होती. त्यांनी सरकारला इलेक्ट्रिक कारच्या सीमा शुल्कात ४० टक्के कपात करण्याची विनंती केली होती. सध्या, इंजिन आकार आणि किंमत, विमा आणि युएस ४०,००० डॉलरपेक्षा कमी किंवा त्याहून अधिक किमतीच्या मालवाहतुकीवर अवलंबून, पूर्णपणे तयार केलेल्या युनिट्समध्ये आयात केलेल्या कारवर ६० टक्क्यांपासून ते १०० टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाते. 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोणत्याही एका कंपनीसाठी विशेष सवलत दिली जाणार नाही. जेव्हा हे लागू होईल, तेव्हा ते सर्व कंपन्यांसाठी असेल. कोणत्याही एका कंपनीला सवलत देणे योग्य होणार नाही. तसेच, जर काही सवलती दिल्या असतील तर त्या सर्वांसाठी अतिशय कठीण कामगिरीशी जोडल्या जातील. सवलत आणि कंपनीशी संबंधित बहुतेक गोष्टी केवळ अनुमानांवर आधारित आहेत.  टेस्लाने सवलती मागितल्या आहेत.

Web Title: indian government thwarted billionaire elon musk wishes tesla may not gets incentives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.