कोरोना काळात हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला मोठा फटका बसला. मात्र, शेअर बाजारातील काही हॉस्पिटॅलिटी शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे, इंडियन हॉटेल्सचा आहे.
टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्सच्या शेअरचा दर ऑल टाईम हाय आहे. या कंपनीच्या स्टॉकवर शेअर बाजारातील गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचाही प्रचंड विश्वास आहे. एवढेच नाही, तर हा स्टॉक बिग बुल यांच्या पोर्टफोलिओमध्येही समाविष्ट आहे.
किती दिला परतावा -
गेल्या एक वर्षात, इंडियन होटलच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 140 टक्के परतावा दिला आहे. गेल्या सोमवारी बीएसई इंडेक्सवर शेअरचा भाव 265.45 रुपयांवर पोहोचला होता. ही गेल्या 52 आठवड्यांतील सोर्वोच्च पातळी होती. कंपनीच्या मार्केच कॅपिटलसंदर्भात बोलायचे झाल्यास, ते 37,164.76 कोटी रुपये एवढे आहे. टाटा समूहाच्या या हॉटेलमध्ये बिग बुल आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचीही गुंतवणूक आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)