Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय मोबाइल उत्पादक कंपन्या चीनसमोर ढेपाळल्या, बाजारात हिस्सा अवघा ९ टक्के 

भारतीय मोबाइल उत्पादक कंपन्या चीनसमोर ढेपाळल्या, बाजारात हिस्सा अवघा ९ टक्के 

एकेकाळी आघाडीवर असलेल्या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी चिनी कंपन्यांपुढे नांगी टाकली आहे. मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन आणि इंटेक्स यांसारख्या भारतीय कंपन्या आता अस्तित्वासाठी झगडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:41 AM2019-02-05T05:41:28+5:302019-02-05T05:41:47+5:30

एकेकाळी आघाडीवर असलेल्या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी चिनी कंपन्यांपुढे नांगी टाकली आहे. मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन आणि इंटेक्स यांसारख्या भारतीय कंपन्या आता अस्तित्वासाठी झगडत आहेत.

Indian mobile manufacturers market share drops is at 9 percent | भारतीय मोबाइल उत्पादक कंपन्या चीनसमोर ढेपाळल्या, बाजारात हिस्सा अवघा ९ टक्के 

भारतीय मोबाइल उत्पादक कंपन्या चीनसमोर ढेपाळल्या, बाजारात हिस्सा अवघा ९ टक्के 

नवी दिल्ली : एकेकाळी आघाडीवर असलेल्या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी चिनी कंपन्यांपुढे नांगी टाकली आहे. मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन आणि इंटेक्स यांसारख्या भारतीय कंपन्या आता अस्तित्वासाठी झगडत आहेत. चिनी कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांमुळे भारतीय कंपन्या मागे पडल्या असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

काऊंटरपॉइंट रिसर्च या संस्थेने केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २0१४ च्या अखेरीस भारतीय कंपन्यांची स्मार्टफोन बाजारातील हिस्सेदारी जवळपास ५0 टक्के होती. ती आता अवघी ९ टक्के राहिली आहे. चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी आपला भारतातील बाजारहिस्सा जवळपास ६0 टक्क्यांवर नेला आहे.

भारतीय कंपन्या दर्जाच्या बाबतीत चिनी कंपन्यांशी स्पर्धा करण्यात कमी पडत आहेत. आयडीसीच्या विश्लेषक उपासना जोशी यांनी सांगितले की, सुरुवातीला भारतीय कंपन्या चांगल्या स्थितीत होत्या.

ग्राहकांना उत्तम बॅटरी बॅकअप असलेला फोन हवा होता, तेव्हा मायक्रोमॅक्सने चांगला पर्याय दिला. त्यांचे रिटेल नेटवर्कही चांगले होते. नंतर मात्र चीनमधून अधिक चांगली उत्पादने बाजारात आली. त्यांचे मार्केटिंगही आक्रमक होते. २0१६ च्या चौथ्या तिमाहीत चिनी कंपन्यांनी ४६ टक्के बाजारपेठ काबीज केली. आता तर भारतीय कंपन्यांची स्थिती इतकी विकोपाला गेली आहे की, सर्वोच्च पाच स्मार्टफोनमध्ये एकही भारतीय ब्रँड नाही. (वृत्तसंस्था)

प्रतिमाही बदलली!

जोशी यांनी सांगितले की, शिओमी हा पहिला चिनी ब्रँड भारतात लाँच झाला होता. तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला. त्यापाठोपाठ ओप्पो आणि विवो यांनीही मुसंडी मारली. चीनची उत्पादने पूर्वी निकृष्ट समजली जात. या ब्रँडस्ने ही प्रतिमा बदलून टाकली. आता चीन म्हणजे दर्जेदार उत्पादने असे समीकरण बाजारात रुढ झाले आहे.

Web Title: Indian mobile manufacturers market share drops is at 9 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.