स्विस बँकांमध्ये असलेली भारतीय रहिवासी आणि कंपन्यांची रक्कम गेल्या वर्षी ११ टक्क्यांनी कमी होऊन ३.४२ अब्ज स्विस फ्रँक (सुमारे ३० हजार कोटी रुपये) झाली आहे. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँक SNB ने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. २०२२ मध्ये स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या भारतीय ग्राहकांच्या एकूण रकमेत घट झाली आहे. वर्षभरापूर्वी म्हणजेच २०२१ मध्ये, भारतीय ग्राहकांनी स्विस बँकांमध्ये ३.८३ अब्ज स्विस फ्रँक इतकी रक्कम ठेवली होती, जी १४ वर्षातील उच्चांकी होती.
याशिवाय गेल्या वर्षी स्विस बँकांमध्ये भारतीयांकडून जमा केल्या जाणाऱ्या रकमेत जवळपास ३४ टक्क्यांची घट होऊन ती ३९.४ कोटी क्रँक झाली आहे. यापूर्वी २०२१ मध्ये ही सात वर्षांच्या उच्चांकी स्तरावर म्हणजेच ६०.२ कोटी फ्रँक होती. या आकडेवारीत कथित काळ्या पैशांचा कोणताही उल्लेख नाही.
या वर्षी विक्रमी स्तरावर
स्विस बँकांमध्ये भारतीयांद्वारे ठेवण्यात आलेली एकूण रक्कम २००६ मध्ये ६.५ अब्ज फ्रँकच्या विक्रमी स्तरावर होती. यानंतर त्यात घसरण झाली. यादरम्यान, २०११, २०१३, २०१७, २०२० आणि २०२१ या कालावधीत स्विस बँकांकडे ठेवण्यात आलेल्या भारतीय ग्राहकांच्या रकमेत वाढ झाली होती.