Indian Oin Corporation : केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचा दावा करत आहेत. त्यामुळे देशातील सरकारी कंपन्याही त्याच मार्गाने काम करत आहेत. विशेष म्हणजे, देशातील सर्व मंत्रालये 2047 चे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत. अशातच, देशातील सर्वात मोठी पेट्रोनियम कंपनी IOCL ने एक घोषणा करुन देशासह जगातील बड्या कंपन्यांना चकीत केला आहे. आतापर्यंत देशातील कोणत्याही सरकारी किंवा खासगी कंपनीने अशी घोषणा केलेली नाही.
देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने, 2047 पर्यंत कमाईच्या बाबतीत US $ 1,000 अब्ज, म्हणजेच $ 1 ट्रिलियन कंपनी बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
गेल्या वर्षी विक्रमी नफा आयओसीचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांनी सांगितले की, कंपनी आपल्या तेल शुद्धीकरण आणि इंधन विपणन व्यवसायासह ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसारख्या स्वच्छ उर्जेद्वारे हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, IOC ने रु. 8.66 लाख कोटी (US $104.6 अब्ज) च्या महसुलावर रु. 39,619 कोटी (US $ 4.7 अब्ज) विक्रमी निव्वळ नफा मिळवला होता.
वैद्य यांनी कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालात सांगितले की, कंपनी संतुलित पोर्टफोलिओसाठी जीवाश्म इंधन आणि नवीन ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करत राहील. 2046 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याचा कंपनीचा मानस आहे. याशिवाय, कंपनी आपली तेल शुद्धीकरण क्षमता वाढवण्यावर आणि पेट्रोकेमिकल युनिट्समध्ये गुंतवणूक करण्यावर भर देईल. तसेच, गॅस, जैवइंधन आणि स्वच्छ वाहतुकीवरही कंपनी विशेष लक्ष देणार आहे.
1 ट्रिलियन डॉलरचे लक्ष्यवैद्य म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीबरोबरच ऊर्जेच्या गरजाही वाढत आहेत. भारताची ऊर्जा म्हणून आम्ही आमच्या क्षमतेचा वेग वाढवत आहोत. आम्हाला देशातील आघाडीची ऊर्जा कंपनी बनायचे आहे आणि आमचे लक्ष्य 2050 पर्यंत भारताच्या एकूण ऊर्जा गरजांपैकी 12.5 टक्के पूर्ण करण्याचे आहे. IOC 2047 पर्यंत ट्रिलियन डॉलर कंपनी बनण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रवासावर आहे. 2047 पर्यंत $30,000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या संकल्पनेनुसार $1,000 अब्ज कंपनी बनण्याचे आमचे लक्ष्य आहे.