Petrol Diesel Rates In Mumbai : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत ताजे अपडेट समोर आले आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं (IOCL) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६ पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हे दर केवळ मुंबईतच वाढले असून वाढीव दर केवळ आयओसीएल पेट्रोल पंपांवर लागू होणार आहेत. मुंबईत राहणाऱ्या लोकांना आता पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त मोजावे लागणार आहेत.
मुंबईत पेट्रोल डिझेल महागलं
इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं (IOCL) मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६ पैशांची वाढ करण्यात आली आहे. हे दर आजपासून लागू झाले असून आता आयओसीएलच्या पेट्रोल पंपावरच पेट्रोल आणि डिझेल वाढीव किंमतीसह मिळणार आहे.
अन्य शहरांची स्थिती काय?
दिल्लीत पेट्रोलचा दर १०१.८४ रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर ८९.२७ रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०७.८३ रुपये तर डिझेलचा दर ९६.८४ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल चा दर १०१.६४ रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर ८९.०७ रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर १०१.६ रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर ८९.०७ रुपये प्रति लीटर आहे.
दररोज सकाळी ६.३० वाजता देशातील इंधन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करतात. किंमतीत बदल केल्यास तो वेबसाइटवर अपडेट केला जातो. आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही सहज जाणून घेऊ शकता.