विशाल शिर्के
पिंपरी : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या दरातील चढ-उतार, डॉलरच्या तुलनेतील भारतीय रुपयाचे अवमूल्यन, अशा विविध कारणांमुळे भारतातील सर्वांत मोठ्या ऑईल कंपनीचा नफा २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये तब्बल १५ हजार ५८१ कोटी रुपयांनी घटून तेराशे कोटी रुपयांपर्यंत घसरला आहे. चौथ्या तिमाहीअखेर पाच हजार कोटींचा तोटा झाल्याने नफ्यात मोठी घट झाली असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर नफ्यात प्रथमच घट झाल्याची माहिती कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिली.
इंडियन आॅइल कंपनीने नुकताच गेल्या आर्थिक वर्षातील ताळेबंद जाहीर केला आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल ८९.९६९ दशलक्ष टन पेट्रोलियम पदार्थांची देश आणि परदेशात विक्री केली. त्यातील ८१.७१ दशलक्ष टन देशांतर्गत खप आहे. यातून पाच लाख ६६ हजार रुपयांचे महसुली उत्पन्न मिळविले आहे. गेल्या वर्षीपेक्षा त्यात ३८ हजार ९८२ कोटी रुपयांची घट आहे. तसेच निव्वळ नफ्यात १५ हजार ५८१ कोटींनी घट झाली आहे. गेल्या वर्षी खरेदी आणि विक्री दरामध्ये कमी तफावत असल्याने नफ्यात मोठी घट झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
>परकीय चलन दरवाढीमुळे ४ हजार कोटींचा तोटा
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या अवमूल्यन या प्रमुख कारणांसह इतर घटकांमुळे २०१९-२० या काळात तब्बल ४,१४५.५३ कोटी रुपयांचा तोटा झाला. त्यापूर्वीच्या (२०१८-१९) वर्षात हा तोटा १,७४०.९४ कोटी रुपये होता.
>असा होतो इंधन प्रवास
क्रूड ऑईल जहाजामधून रिफायनरी कंपनीमध्ये पोहोचणे आणि त्यावर प्रक्रिया होण्यासाठी ४५ ते ६५ दिवसांचा कालावधी लागतो. क्रूड ऑईलच्या रिफायनरी दरातील तफावत २०१९-२० या आर्थिक वर्षात प्रतिबॅरल ०.०८ डॉलर होती, तर २०१८-१९ मध्ये हीच तफावत ५.४१ डॉलर होती. त्यामुळे त्या आर्थिक वर्षात कंपनीच्या नफ्यात वाढ झाली. तर, यंदा नफा घटला.
इंडियन ऑईलचा नफा १५ हजार कोटींनी घटला
चौथ्या तिमाहीअखेर पाच हजार कोटींचा तोटा झाल्याने नफ्यात मोठी घट झाली असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर नफ्यात प्रथमच घट झाल्याची माहिती कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिली.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 02:19 AM2020-06-27T02:19:52+5:302020-06-27T02:20:19+5:30