जगात स्वस्त औषधांच्या बाबतीत भारताची एक वेगळी ओळख आहे. भारत हा एक असा देश आहे, जो नफ्या पेक्षाही औषधी स्वस्त कशी होईल आणि ती सामान्यांतील सामान्य व्यक्तींपर्यंत कशी पोहोचेल? याचा विचार करतो. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे, कोरोना काळात भारताने बजावलेली भूमिका. यासाठी भारताचे जगातील विविध स्तरांतून कौतुकही झाले. पण, भारतीय औषध उद्योगात नफ्याऐवजी किफायती किंमतीचा पायंडा पाडणाऱ्या कंपनीचे नाव आपल्याला माहीत आहे...? आता ही कंपनी विकणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
या भारतातील सर्वात जुन्या कंपनीचे नाव आहे सिप्ला. ही कंपनी 1935 मध्येय The Chemical, Industrial & Pharmaceutical Laboratories या नावाने ख्वाजा अब्दुल हमीद यांनी सुरू केली होती. ते एक केमिस्ट आणि उद्योजग होते.
गांधी, नेहरू, सुभाष... होते फॅन -
त्यावेळी ख्वाजा हमीद हे जर्मनीमध्ये केमिस्ट म्हणून काम करत होते. पश्चात्य औषध कंपन्या भारत आणि भारतासारख्या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांसंदर्भात फारसा विचार करत नव्हत्या. एका मोठ्या समूहाला औषधी उपलब्धही होऊ शकत नव्हती. तेव्हा ख्वाजा हमीद यांनी जर्मनीतून भारतात येऊन स्वदेशी औषध निर्माता कंपनी सुरू केली. महत्वाचे म्हणजे, खुद्द महात्मा गांधींपासून, पंडित नेहरूंपासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पर्यंत अनेक दिग्गज सिप्लाचे फॅन झाले होते. ख्वाजा हमीद यांनी औषध निर्मिती क्षेत्रातील परदेशी कंपन्यांच्या दबदबब्याला आव्हान देत स्वदेशी आणि स्वस्त औषधांसाठी एक आस निर्माण केली होती.
यानंतर देशाचा कायदाच बदलला -
आज भारत जगाची ड्रग कॅपिटल अर्थात औषधांची राजधानी म्हणून ओळखला जातो. कारण भारतातील औषध कंपन्या सर्वसामान्यांसाठी औषधे बनविण्यावर भर देतात. भारतीय कंपन्या जेनेरिक औषधे बनवितात, जी जगातील गरीब लोकही सहजपणे विकत घेऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, याच जेनेरिक क्रांतीची सुरुवातही झाली ती सिप्लापासून. ख्वाजा अब्दुल हमीद यांच्यानंतर युसूफ ख्वाजा हमीद यांनी सिप्लाची धुरा सांभाळली. साधारणपणे, 1972 मध्ये सिप्लाने हृदयविकारावरील उपचारासाठी Propranolol या औषधाचे जेनेरिक व्हर्जन तयार केले. यानंतर, औषधाचा शोध लावणाऱ्या इंपीरियल केमिकल इंडस्ट्रीज या ब्रिटिश कंपनीने सिप्लाविरुद्ध खटला भरला.
तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. युसूफ हमीद यांनी या संदर्भात पंतप्रधानांची भेट घेतली आणि केवळ एकच प्रश्न केला की, या औषधाचा शोध लावणाऱ्यांना आपल्या स्कीनचा रंग पसंत नाही, म्हणून कोट्यवधी भारतीयांना हे जीव वाचविणारे औषध मिळू नये? मग काय, भारताने पेटंट कायद्यातच बदल केला. येथूनच जेनेरिक, म्हणजेच स्वस्त औषधाचा मार्ग मोकळा झाला.
स्वदेशी कंपनी विदेशी होणार -
माध्यमांतील वृत्तांनुसार, सिप्लाचे प्रवर्तक त्यांचे संपूर्ण स्टेक परदेशी कंपनी ब्लॅकस्टोनला विकण्याच्या तयारीत आहे. सध्या सिप्लाची धुरा, युसूफ हमीद यांची भाची समीना यांच्या खांद्यावर आहेत. या कुटुंबाकडे सिप्लाचे 33.47 टक्के हिस्सेदारी आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, जगातील सर्वात मोठी प्रायव्हेट इक्विटी फर्म ब्लॅकस्टोन सिप्लाच्या 33.47 टक्के हिस्सेदारीसाठी सर्वाधिक बोली लावू शकते. असे झाल्यास, ही स्वदेशी कंपनी विदेशी होणार आहे.