Indian Railway: लोकसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारकडून तिसऱ्या टर्मची तयारी सुरू झाली आहे. यासाठी सरकारने पहिल्या 100 दिवसांचा प्लॅन तयार केला आहे. विशेष म्हणजे, भारतीय रेल्वेनेदेखील मोदी 3.0 साठी विशेष योजना आखली आहे. यात प्रवाशांसाठी 24 तासात तिकीट परतावा योजना, सर्व रेल्वे सुविधांसाठी सुपर ॲप, तीन आर्थिक कॉरिडॉर आणि स्लीपर वंदे भारत ट्रेन, यासह अनेक सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
नवीन तिकीट रिफंड सिस्टीमएएनआय या वृत्तसंस्थेला सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच नवीन तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत 24 तासांच्या आत तिकीट परतावा मिळेल. सध्या, तिकीट परताव्यासाठी तीन दिवस ते एक आठवडा लागतो.
रेल्वे सुपर ॲपलवकरच रेल्वेकडून सुपर अॅप तयार केले जाणार आहे. या सुपर ॲपद्वारे प्रवासी एकाच ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने रेल्वे तिकीट बुक करणे, रद्द करणे. याशिवाय ट्रेनमध्ये खाद्यपदार्थही मागवण्यासोबतच इतर अनेक सुविधा मिळतील.
पीएम रेल प्रवासी विमा योजनासरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत 'पीएम रेल यात्री विमा योजना' सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याशिवाय पुढील 5 वर्षांत रेल्वेमध्ये 10 ते 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, जेणेकरून भारतीय रेल्वे जागतिक दर्जाची रेल्वे बनू शकेल.
वंदे भारत तीन श्रेणींमध्ये येईलवंदे भारत ट्रेन तीन श्रेणींमध्ये चालवण्याचा सरकार विचार करत असल्याची माहिती आहे. पहिली वंदे भारत मेट्रो असेल, जी 100 किलोमीटरपेक्षा कमी मार्गांवर चालवली जाईल. वंदे चेअर कार 100 ते 550 किलोमीटरच्या मार्गावर धावेल. तर, स्लीपर वंदे भारत ट्रेन 550 किलोमीटरहून अधिक अंतरावर धावेल.