Join us

Bad News For Railway Passengers : रेल्वे प्रवाशांसाठी बॅड न्यूज, तब्बल 50 रुपयांपर्यंत वाढणार 'या' ट्रेन्सचं भाडं! जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 5:11 PM

या भाडेवाढीअंतर्गत, एसी क्लाससाठी 50 रुपये, स्लीपर क्लाससाठी 25 रुपये आणि जनरल क्लाससाठी 10 रुपये अशा तीन श्रेणींमध्ये पैसे आकारले जातील.

नवी दिल्ली - डिझेल इंजिनवर धावणाऱ्या गाड्यांमधून लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अधिकचे भाडे मोजावे लागू शकते. हे अतिरिक्त भाडे 15 एप्रिलपासून तिकीट बुकिंग वेळी रेल्वे प्रवासात जोडले जाईल. खरे तर, रेल्वे बोर्ड डिझेल इंजिनवर चालणाऱ्या रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांवर 10 ते 50 रुपयांपर्यंत हायड्रोकार्बन अधिभार (HCS) अथवा डिझेल टॅक्स आकारण्यासंदर्भात योजना तयार करत आहे. डिझेल इंजिनचा वापर करून अर्ध्याहून अधिक अंतरापर्यंत धावणाऱ्या गाड्यांवर हा अधिभार लागू असेल.

50 रुपयांपर्यंत होणार भाडे वाढ -या भाडेवाढीअंतर्गत, एसी क्लाससाठी 50 रुपये, स्लीपर क्लाससाठी 25 रुपये आणि जनरल क्लाससाठी 10 रुपये अशा तीन श्रेणींमध्ये पैसे आकारले जातील. उपनगरीय रेल्वे प्रवासाच्या तिकिटांवर असा कोणताही अधिभार लावला जाणार नाही. 

निर्धारित अंतराच्या 50 टक्के डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांची यादी करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने सर्व झोनला दिले आहेत. या यादीत दर तीन महिन्यांनी सुधारणा केली जाईल. तथापि, 15 एप्रिलपूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर अधिभार लावण्यासंदर्भात अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.

रेल्वेच्या विद्युत मोहिमेसाठीही होईल उपयोग - भारतीय रेल्वेच्या सुरू असलेल्या विद्यूत मोहिमेसाठीही HCS अधिभार वापरला जाईल. रेल्वे राष्ट्रीय ट्रांसपोर्टर 'मिशन 100 टक्के विद्युतीकरण - नेट जीरो कार्बन उत्सर्जन' योजनेंतर्गत जनतेला पर्यावरण अनुकूल, हरित आणि स्वच्छ परिवहन देण्याच्या दृष्टीने आपल्या संपूर्ण ब्रॉड गेज नेटवर्कला विद्युतीकृत करण्यासाठी एका मिशन मोडवर आहे. या भाडे वाढीचा अर्थ, रेल्वेचे एकूण भाडे वाढणार, असाच आहे.  

टॅग्स :रेल्वेभारतीय रेल्वे