नवी दिल्ली : देशातील 11 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. सरकार लवकरच लाखो कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट देणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बोनसवर निर्णय घेतला जाऊ शकतो, म्हणजेच यावेळी दिवाळीच्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम येऊ शकते.
उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रोडक्शन लिंक्ड (Production Linked) बोनसला मंजुरी मिळू शकते. उद्या होणाऱ्या बैठकीत Non Gazetted कर्मचाऱ्यांना संपूर्ण 78 दिवसांच्या बोनसचा प्रस्ताव ठेवला जाईल. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा जवळपास 11 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रोडक्शन लिंक्ड बोनसवर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वेवर 2000 कोटींचा अतिरिक्त खर्च होणार आहे. रेल्वे बोर्डाने याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून, त्याला लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते. मंत्रिमंडळ सहसा दसऱ्याच्या दिवशी रेल्वे कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर करते.
17951 रुपये येईल बोनसजर आपण बोनसच्या रकमेबद्दल बोललो, तर पात्र रेल्वे कर्मचार्यांना पीएलबी पेमेंटसाठी निर्धारित वेतन कॅलक्युलेशनची मर्यादा 7000 रुपये प्रति महिना असणार आहे. म्हणजेच 78 दिवसांचा बोनस खात्यात आला तर खात्यात जास्तीत जास्त 17951 रुपये येतील. गेल्या वर्षी 2021 मध्ये देखील रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला होता. रेल्वे कर्मचाऱ्याला 30 दिवसांसाठी 7000 रुपये बोनस मिळेल. अशा परिस्थितीत कर्मचार्यांना जवळपास 18000 रुपयांचा बोनस मिळण्याची शक्यता आहे.