Lokmat Money > बिझनेस न्यूज > Indian Railways: रेल्वे प्रवाशांना झटका! आता प्रवासादरम्यान मिळणार नाही 'ही' मोठी सुविधा, सरकारची माहिती 

Indian Railways: रेल्वे प्रवाशांना झटका! आता प्रवासादरम्यान मिळणार नाही 'ही' मोठी सुविधा, सरकारची माहिती 

 वर्ष 2019 मध्ये, माजी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली होती की, केंद्र साडेचार वर्षांत रेल्वेत वाय-फाय देण्याची योजना आखत आहे. मात्र, यात अडचणी होत्या. यामुळे आता रेल्वे याला रेल्वे प्रोजेक्टमधून हटविण्यात आले आहेय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 01:25 PM2021-09-05T13:25:28+5:302021-09-05T13:26:39+5:30

 वर्ष 2019 मध्ये, माजी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली होती की, केंद्र साडेचार वर्षांत रेल्वेत वाय-फाय देण्याची योजना आखत आहे. मात्र, यात अडचणी होत्या. यामुळे आता रेल्वे याला रेल्वे प्रोजेक्टमधून हटविण्यात आले आहेय

Indian railway cancels project to provide wi-fi service in trains central govt said not cost effective know here | Indian Railways: रेल्वे प्रवाशांना झटका! आता प्रवासादरम्यान मिळणार नाही 'ही' मोठी सुविधा, सरकारची माहिती 

Indian Railways: रेल्वे प्रवाशांना झटका! आता प्रवासादरम्यान मिळणार नाही 'ही' मोठी सुविधा, सरकारची माहिती 

नवी दिल्ली - रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, की आता आपल्याला प्रवासादरम्यान मिळणारी एक विशेष सुविधा मिळणार नाही. भारत सरकार गेल्या काही दिवसांपासून रेल्वेत आणि रेल्वे स्थानकांवर (Railway Stations)प्रवाशांना Wi-Fi ची सुविधा देत आहे. मात्र, आता सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (Indian railway cancels project to provide wi-fi service in trains central govt said not cost effective know here)

 वर्ष 2019 मध्ये, माजी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली होती की, केंद्र साडेचार वर्षांत रेल्वेत वाय-फाय देण्याची योजना आखत आहे. मात्र, यात अडचणी होत्या. यामुळे आता रेल्वे याला रेल्वे प्रोजेक्टमधून हटविण्यात आले आहेय

Online तिकिट बुकिंगच्या नियमांत बदल; Mobile नंबर व्हेरिफाय करणं अनिवार्य

आता प्रवाशांना Wi-Fi सेवा मिळणार नाही - 
आता हा प्रोजेक्ट भारतीय रेल्वेने हटविला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वेमध्ये रेल्वे गाड्यांमध्ये इंटरनेट कनेक्शन देण्याऱ्या प्रकल्पाला कॉस्ट-इफेक्टिव्ह नसल्याने स्थगिती दिली आहे. यासंदर्भात सरकारने संसदेत माहिती दिली आहे. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, पायलट प्रोजेक्ट अंतर्गत सरकारने हावडा राजधानी एक्सप्रेसमध्ये सॅटेलाइट कम्युनिकेशन टेक्नोलॉजीच्या माध्यमाने वाय-फाई इंटरनेटची सुविधा दिली आहे.

रेल्वेत प्रवाशांना दिलेली इंटरनेट बँडविड्थसुद्धा अपुरी -
पायलट प्रोजेक्टदरम्यान दिसून आले, की टेक्नोलॉजी इंटेंसिव्ह कॅपिटलसोबतच रिकरिंग कॉस्टदेखील आवश्यक असते. जसे, बँडविड्थ शुल्क, जे  या प्रोजेक्टला कॉस्ट-इफेक्टिव्ह बनवत नाहीत. याच बरोबर, रेल्वेत प्रवाशांना दिलेली इंटरनेट बँडविड्थसुद्धा अपुरी होती. रेल्वे मंत्री म्हणाले, अद्याप रेल्वेमध्ये वाय-फाय इंटरनेट सुविधांसाठी उपयुक्त अथवा किफायतशीर तंत्रज्ञान उपलब्ध नाही. सध्या भारतीय रेल्वे 6,000 हून अधिक रेल्वेस्थानकांवर वाय-फाय सुविधा देत आहे.

मध्य रेल्वेची पहिल्या तिमाहीत उत्कृष्ठ कामगिरी, पार्सल महसुलात 574% वाढ

Web Title: Indian railway cancels project to provide wi-fi service in trains central govt said not cost effective know here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.