Join us

Confirmed Train Ticket : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावत्या ट्रेनमध्येही मिळेल कन्फर्म तिकीट 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 12:07 PM

Confirmed Train Ticket : आता तुम्हाला धावत्या ट्रेनमध्येही कन्फर्म सीट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला सीटची काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी रेल्वेने नवीन टेक्नॉलॉजी सुरू केली आहे. 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) जगातील चौथ्या आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. येथे दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या सेवेत सातत्याने सुधारणा करत आहे. नुकतीच रेल्वेने प्रवास करणाऱ्या करोडो प्रवाशांना मोठी बातमी दिली आहे. आता तुम्हाला धावत्या ट्रेनमध्येही कन्फर्म सीट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला सीटची काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी रेल्वेने नवीन टेक्नॉलॉजी सुरू केली आहे. 

या टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे प्रवाशांना वेटिंग किंवा आरएसी तिकीट (RAC Ticket) कन्फर्म करण्यासाठी कोणत्याही टीटीईच्या (TTE) फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. रेल्वेच्या हँड होल्डिंग डिव्हाइसच्या (HHT) मदतीने ही सुविधा उपलब्ध होणार आहे. रिकाम्या जागा या मशीन्समधून रिअल टाइम अपडेट केल्या जात आहेत. याचा थेट फायदा प्रवाशांना होत आहे. याचा वापर करून दररोज हजारो प्रवाशांची तिकिटे कन्फर्म होत आहेत.

दरम्यान, एखाद्या प्रवाशाने काही कारणास्तव ट्रेनमध्ये प्रवास केला नाही तर त्याची सीट रिकामीच राहते. यापूर्वी टीटीई ही रिक्त जागा वेटिंगवर असणाऱ्या व्यक्तीला देत असे. पण आता रिकाम्या सीट्सची माहिती एचएचटी डिव्हाइसवर सजमते. ट्रेनमध्ये कोणतीही सीट रिकामी असल्यास ती वेटिंग किंवा आरएसी प्रवाशाला उपलब्ध होईल. यामुळे प्रवाशांची खूप सोय होणार असून त्यांना धावत्या ट्रेनमध्येच कन्फर्म तिकीट मिळणार आहे.

अशी आहे टेक्नॉलॉजीही नवीन टेक्नॉलॉजी रेल्वेने गेल्या महिन्यात सुरू केली होती. एचएचटी मशीन हे आयपॅडसारखे आहे. त्यात प्रवाशांचा तक्ता असतो. हा चार्ट सतत अपडेट केला जातो. याच्या मदतीने वेटिंग, आरएसी आणि कॅन्सल केलेल्या सीटची माहिती अपडेट होत राहते. ही सुविधा रेल्वेच्या आरक्षण प्रणालीशी जोडलेली आहे. त्यामुळे त्यावर अपडेट केलेली माहिती 100 टक्के बरोबर असते.

टॅग्स :भारतीय रेल्वेव्यवसायरेल्वे