नवी दिल्ली : देशातील मोठ्या संख्येने लोक प्रवासासाठी भारतीय रेल्वेचा (Indian Railways) वापर करतात. कोरोना संकट काळात रेल्वे कामकाजावर वाईट परिणाम झाला. मात्र, रेल्वेने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले आणि विशेष गाड्या (Special Trains) चालवून लाखो लोकांना त्यांच्या निश्चित ठिकाणापर्यंत पोहोचविले.
या काळात रेल्वेने प्रवाशांना संसर्गापासून वाचवण्यासाठी अनेक सुविधा बंद केल्या होत्या. यामध्ये प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये जेवण (E-Catering Service) पुरवणे ही एक सुविधा होती. आता कोरोनाची परिस्थिती सुधारली असून, आयआरसीटीसी (IRCTC) या रेल्वेच्या सहयोगी कंपनीने ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरू केली आहे. म्हणजचे सोप्या भाषेत सांगायचे तर रेल्वे प्रवाशांना आता प्रवासाला घरातून अन्न आणण्याची गरज नाही.
रेल्वे प्रवाशांना यापुढे गाडीत उपाशी राहण्याची गरज भासणार नाही, असे आयआरसीटीसीने ट्विट केले आहे. आयआरसीटीसीने ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरू केली आहे. फक्त काही स्वाइपमध्ये लांब किंवा जवळच्या प्रवासासाठी आपले आवडते जेवण ऑर्डर करा आणि ते आपल्या ट्रेन बर्थवर पोहोचवा. याचबरोबर, अधिक माहितीसाठी http://ecatering.irctc.co.in किंवा आयआरसीटीसी "फूड ऑन ट्रॅक" अॅप डाउनलोड करा आणि १३२३ वर कॉल करा.
पुढील 5 वर्षांत 10,000 लोकांना रोजगार देणार PwC India https://t.co/fjJKIrnYC3#job
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2021
कॅश ऑन डिलिव्हरीची सुद्धा मिळेल सुविधा
>> आयआरसीटीसीची ई-केटरिंग वेबसाइट https://www.ecatering.irctc.co.in/ लॉग ऑन करा.
>> आपला दहा अंकी पीएनआर क्रमांक प्रविष्ट करा.
>> आपल्या ट्रेनच्या आधारे कॅफे, आउटलेट्स आणि क्विक रेस्टॉरंट सेवांच्या यादीतून खाद्यपदार्थ निवडा.
>> ऑर्डर करा आणि पेमेंट पर्याय निवडा. तुम्ही ऑनलाइन किंवा कॅश ऑन डिलिव्हरीद्वारे पेमेंट देखील करू शकता.
>> जेवणाची ऑर्डर तुमच्या सीट/बर्थवर वितरित केली जाईल.
SBI, PNB कोणत्या बँकेच्या ATM मधून किती कॅश काढता येईल? जाणून घ्या सविस्तर https://t.co/JiG0nO1QaA#Banks
— Lokmat (@MiLOKMAT) August 12, 2021
IRCTC चे नवीन ई-केटरिंग अॅप
आयआरसीटीसीच्या ई-केटरिंग वेबसाइटनुसार, डॉमिनोज, कमसम, जोप, रेलरेस्ट्रो, रेलफूड, गर्ग राजधानी ऑनलाइन फूड, यात्री, रेल्वे रेसिपी सह 500 हून अधिक रेस्टॉरंट्स या वेबसाइटचा एक भाग आहेत. कंपनीने आपले नवीन ई-केटरिंग अॅपदेखील सादर केले आहे, जे गुगल प्ले (Google Play) आणि आयट्यून्स (iTunes) वरून डाउनलोड केले जाऊ शकते.