Lokmat Money > बिझनेस न्यूज > आधी प्रवास करा, नंतर पैसे द्या; IRCTC ने प्रवाशांसाठी सुरू केली नवी सुविधा

आधी प्रवास करा, नंतर पैसे द्या; IRCTC ने प्रवाशांसाठी सुरू केली नवी सुविधा

Travel Now Pay Later : याद्वारे तुम्ही कोणतेही पैसे खर्च न करता रेल्वे तिकीट बुक करू शकता. 'ट्रॅव्हल नाऊ पे लेटर' असे या सुविधेचे नाव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 05:25 PM2022-10-18T17:25:00+5:302022-10-18T17:26:14+5:30

Travel Now Pay Later : याद्वारे तुम्ही कोणतेही पैसे खर्च न करता रेल्वे तिकीट बुक करू शकता. 'ट्रॅव्हल नाऊ पे लेटर' असे या सुविधेचे नाव आहे.

indian railway irctc travel now pay later facility introduced by cashe know details | आधी प्रवास करा, नंतर पैसे द्या; IRCTC ने प्रवाशांसाठी सुरू केली नवी सुविधा

आधी प्रवास करा, नंतर पैसे द्या; IRCTC ने प्रवाशांसाठी सुरू केली नवी सुविधा

नवी दिल्ली : रेल्वे ही सर्वसामान्यांच्या जीवनाची लाइफलाइन मानली जाते. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने आपल्या घरी जातात. भारतात सणासुदीला (Festive Season) सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत लोक मोठ्या संख्येने आपापल्या घरी जात आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने अनेक सणानिमित्त विशेष गाड्या (Festival Special Train) सुरू केल्या आहेत. या गाड्यांमधील आरक्षणासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉरपोरेशन (IRCTC) ने प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे.

याद्वारे तुम्ही कोणतेही पैसे खर्च न करता रेल्वे तिकीट बुक करू शकता. 'ट्रॅव्हल नाऊ पे लेटर' असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे ग्राहक खात्यात पैसे नसतानाही रेल्वे तिकीट (Railway Ticket Booking TNPL) बुक करू शकतात. तुम्हाला ही सुविधा आयआरसीटीसीच्या Rail Connect अॅपवर देखील मिळते. आयआरसीटीसीने 'Travel Now Pay Later' ची सुविधा देण्यासाठी CASHe सोबत भागीदारी केली आहे.

तुम्ही दिवाळी किंवा छठसाठी घरी जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आयआरसीटीसीचे 'Travel Now Pay Later' वापरून ट्रेनमध्ये सीट बुक करू शकता. अनेकदा लोकांसोबत असे घडते की, त्यांना आपत्कालीन परिस्थितीत तिकीट बुक करावे लागते, परंतु त्यांच्याकडे तिकीट बुक करण्यासाठी पैसे नसतात. अशा परिस्थितीत या सुविधेचा फायदा घेऊन तुम्ही कोणतेही पैसे खर्च न करता रेल्वे तिकीट बुक करू शकता.

CASHe चा EMI पर्याय निवडून तुम्ही सहज तिकिटे बुक करू शकता. तुम्ही हे तिकीट 3 ते 6 महिन्यांच्या EMI पर्यायाद्वारे पेमेंट करू शकता. या सुविधेमुळे देशभरातील करोडो रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेष बाब म्हणजे तुम्ही तत्काळ आणि नॉर्मल तिकीट बुकिंगसाठी'Travel Now Pay Later' सुविधा वापरू शकता. ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज नाही.

CASHe चे अध्यक्ष काय म्हणाले?
आयआरसीटीसीमार्फत देशभरात 'Travel Now Pay Later' सुविधा सुरू करण्यात आली आहे. या अॅपद्वारे दररोज 15 लाख लोक तिकीट बुक करतात. अशा परिस्थितीत आम्ही अधिकाधिक लोकांना 'Travel Now Pay Later'सुविधा उपलब्ध करून देऊ, असे CASHe चे अध्यक्ष व्ही. रमण कुमार यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले. दरम्यान, CASHe आपली आर्थिक सेवा 'Travel Now Pay Later'सेवेद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची योजना आखत आहे. यासोबतच ते भारतातील सर्वात मोठे डिजिटल क्रेडिट प्लॅटफॉर्म बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

IRCTC Rail Connect अॅपद्वारे करू शकता तिकीट बुकिंग
तुम्ही दिवाळी आणि छठला तुमच्या घरी जाण्याचा विचार करत आहात, पण जर तुम्हाला लगेच आरक्षण मिळत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. IRCTC च्या Rail Connect अॅपद्वारे तुम्ही सहजपणे रिझर्व्हेशन करू शकता. यासाठी तुम्हाला ते Google Play Store किंवा iPhone Store वरून डाउनलोड करावे लागेल. यानंतर, काही सोप्या स्टेप्स फॉलो करून, तुम्ही सहजपणे रेल्वे तिकीट बुक कराल. जर तुमच्याकडे सध्या बुकिंगसाठी पैसे नसतील, तर तुम्ही CASHe TNPL पर्याय देखील निवडू शकता.

Web Title: indian railway irctc travel now pay later facility introduced by cashe know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.