Lokmat Money > बिझनेस न्यूज > Indian Railway : आता तिकीट नसलं तरी TC मागे धावण्याची गरज नाही, चालत्या ट्रेमध्ये असं मिळवा Online सीट

Indian Railway : आता तिकीट नसलं तरी TC मागे धावण्याची गरज नाही, चालत्या ट्रेमध्ये असं मिळवा Online सीट

IRCTC च्या सहाय्याने असे शोधता येईल तिकिट...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 01:22 PM2023-04-28T13:22:55+5:302023-04-28T13:39:12+5:30

IRCTC च्या सहाय्याने असे शोधता येईल तिकिट...

Indian railway know about how to find empty seat in moving train by irctc check here | Indian Railway : आता तिकीट नसलं तरी TC मागे धावण्याची गरज नाही, चालत्या ट्रेमध्ये असं मिळवा Online सीट

Indian Railway : आता तिकीट नसलं तरी TC मागे धावण्याची गरज नाही, चालत्या ट्रेमध्ये असं मिळवा Online सीट

जर आपण वेटिंग तिकिटासह ट्रेनने प्रवास करत असाल आणि आपल्याला सीट हवे असेल, तर आपण काही मिनिटांत ट्रेनमधील रिकाम्या सीट शोधू शकता. यासाठी आपल्याला रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बर्थची स्थिती जाणून घ्यावी लागेल. याच्या सहाय्याने आपल्याला कोणता कोच रिकामा आहे, कोणता बर्थ रिकामा आहे आणि त्याचा क्रमांक काय? हे कळू शकते. यानंतर आपण ते सीट टीटीईच्या माध्यमाने आपल्या नावाने आरक्षित करू शकता. हे अत्यंत सोपे असून, यामुळे आपला प्रवासही सुखकर होईल.

IRCTC च्या सहाय्याने असे शोधता येईल सीट-
जर आपण ट्रेनने प्रवास करत असाल आणि आपल्याला ट्रेनमध्ये सीट बुक करायचे असेल, तर IRCTC च्या अधिकृत वेबसाइट जा, यावर आपल्याला होम पेजवर बुक तिकीट टॅब दिसेल. यावर, आपल्याला पीएनआर स्टेटस आणि चार्ट/व्हॅकेन्सीचा टॅब दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर, रिझर्व्हेशन चार्ट आणि जर्नी डिटेलचा टॅब ओपन होईल.

जर्नी डिटेल्सचा टॅब ओपन झाल्यानंतर, आपल्याला ट्रेन नंबर, स्टेशन आणि प्रावासाच्या तारखेसह बोर्डिंग स्टेशनचे नाव टाकावे लागेल. यानंतर, आपण क्लास आणि कोचच्या आधरे, सीट्सची माहिती मिळवू शकतात. कोणत्या कोचमध्ये कोणते सीट खाली आहेत, यासंदर्भातील संपूर्ण माहिती आपल्याला येथे मिळू शकते. अशा पद्धतीने आपण ट्रेनमधील खाली सीट्सची माहिती मिळवू शकता आणि सीट बुक करू शकता.
 

Web Title: Indian railway know about how to find empty seat in moving train by irctc check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.