Lokmat Money > बिझनेस न्यूज > Indian Railways : चार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या रेल्वे तिकिटांवर मिळेल रिफंड! IRCTC ने सांगितली नवीन पद्धत

Indian Railways : चार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या रेल्वे तिकिटांवर मिळेल रिफंड! IRCTC ने सांगितली नवीन पद्धत

Indian Railways : अनेक वेळा काही आपत्कालीन परिस्थितीमुळे ट्रेनचा चार्ट तयार केल्यानंतरही तुम्हाला ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागते. मात्र, अशा परिस्थितीतही तुम्हाला तिकीट रद्द केल्याचा रिफंड (Indian Railways refund Rule) मिळेल. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:10 AM2022-03-23T11:10:27+5:302022-03-23T11:16:22+5:30

Indian Railways : अनेक वेळा काही आपत्कालीन परिस्थितीमुळे ट्रेनचा चार्ट तयार केल्यानंतरही तुम्हाला ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागते. मात्र, अशा परिस्थितीतही तुम्हाला तिकीट रद्द केल्याचा रिफंड (Indian Railways refund Rule) मिळेल. 

indian railway refund rule refund will be given on canceled train ticket after chart prep see process irctc | Indian Railways : चार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या रेल्वे तिकिटांवर मिळेल रिफंड! IRCTC ने सांगितली नवीन पद्धत

Indian Railways : चार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या रेल्वे तिकिटांवर मिळेल रिफंड! IRCTC ने सांगितली नवीन पद्धत

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. सध्याच्या काळात भारतात दररोज करोडो लोक ट्रेनने प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेशी संबंधित अपडेट्सची (Indian Railways Latest Update) माहिती असणे आवश्यक आहे. अनेक वेळा काही आपत्कालीन परिस्थितीमुळे ट्रेनचा चार्ट तयार केल्यानंतरही तुम्हाला ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागते. मात्र, अशा परिस्थितीतही तुम्हाला तिकीट रद्द केल्याचा रिफंड (Indian Railways refund Rule) मिळेल. 

यासंदर्भात माहिती देताना भारतीय रेल्वेने सांगितले की, चार्ट तयार झाल्यानंतर तुम्ही काही कारणास्तव ट्रेनचे तिकीट रद्द केले तरीही तुम्ही रिफंडचा दावा करू शकता. आयआरसीटीसीने (IRCTC) आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, भारतीय रेल्वे प्रवास न करता किंवा अर्धवट प्रवास न करता तिकीट रद्द केल्यावर रिफंड देते. यासाठी तुम्हाला रेल्वेच्या नियमांनुसार तिकीट डिपॉझिट रिसिट (TDR) जमा करावी लागेल.

असा फाइल करा ऑनलाइन टीडीआर...
- यासाठी तुम्ही प्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वर जा.
- आता होम पेजवर जाऊन My Account वर क्लिक करा.
- यानंतर  ड्रॉप डाउन मेनूवर जा आणि My transaction वर क्लिक करा.
- येथे तुम्ही  File TDR ऑप्शनमधील कोणताही एक ऑप्शन निवडून फाइल टीडीआर करू शकता.
- आता तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती दिसेल ज्याच्या नावावर तिकीट बुक केले आहे.
- आता येथे तुम्ही तुमचा पीएनआर क्रमांक, ट्रेन क्रमांक आणि कॅप्चा भरा आणि रद्द करण्याच्या नियमांच्या बॉक्सवर टिक करा.
- आता तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला बुकिंगच्या वेळी फॉर्ममध्ये दिलेल्या नंबरवर एक ओटीपी मिळेल.
- येथे ओटीपी टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
- पीएनआर डिटेल्स व्हेरिफिकेशन करा आणि तिकीट रद्द करा ऑप्शनवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला खाली रिफंड रक्कम दिसेल.
- बुकिंग फॉर्मवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज मिळेल, ज्यामध्ये पीएनआर आणि रिफंडचे डिटेल्स मिळतील.

Web Title: indian railway refund rule refund will be given on canceled train ticket after chart prep see process irctc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.