Join us

रेल्वे प्रवाशांना दिलासा; नवीन वर्ष आणि ख्रिसमससाठी स्पेशल ट्रेन धावणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 3:13 PM

Indian Railway : दक्षिण रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 17  स्पेशल ट्रेन केरळमधील काही स्थानकावर चालविण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 51 स्पेशल ट्रेन (Special Train) सुरू करण्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. या ट्रेन आगामी ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या (New Year)पार्श्वभूमीवर सुरू करण्यात येणार आहे. 

दक्षिण रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 17  स्पेशल ट्रेन केरळमधील काही स्थानकावर चालविण्यात येणार आहेत. केरळमधील विविध विभागांसाठी या ट्रेन सुरू होणार आहेत. भारतीय रेल्वेने (Indian Railway) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण रेल्वे झोनमध्ये 34 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. याशिवाय दक्षिण मध्य रेल्वे झोनमध्ये 22 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. याचबरोबर, दक्षिण स्पेशल ट्रेनसाठी 8 स्पेशल ट्रेनआणि पूर्व किनारपट्टी रेल्वेसाठी चार स्पेशल ट्रेन चालवल्या जातील. 

अशाप्रकारे, नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर रेल्वे 51 सर्व्हिस ट्रेन चालवणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी या 51 फेऱ्या ट्रेन्स 22 डिसेंबर ते 2 जानेवारी 2023 या कालावधीत धावतील. त्यानंतर या ट्रेन थांबवण्यात येतील. स्थानकांवरची गर्दी कमी करण्यासाठी या गाड्या चालवल्या जातील, असे रेल्वेने सांगितले. विशेष म्हणजे, स्पेशल ट्रेनसाठी रेल्वे सामान्य गाड्यांपेक्षा जास्त भाडे आकारते.

स्पेशल ट्रेन सुरू करण्याची मागणीअलीकडेच तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी लोकांच्या मागणीनंतरही रेल्वे नवीन वर्ष आणि ख्रिसमस स्पेशल ट्रेन चालवत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच, याप्रकरणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, केरळवासीयांना आश्चर्य वाटत आहे की भारतीय रेल्वेने यावर्षी  ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या गर्दीसाठी कोणत्याही विशेष ट्रेनची घोषणा केली नाही. तसेच, केरळच्या बाहेर राहणाऱ्या आणि काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यासाठी विशेष ट्रेन चालवण्याची मागणी करण्यात आली होती.

फेस्टिव्हल सीजनमध्ये स्पेशल ट्रेन चालविल्या जाणारविशेष म्हणजे, रेल्वेने ऑक्टोबर महिन्यात अनेक स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. या स्पेशल ट्रेन सुमारे 1 महिना चालवण्यात आल्या, ज्या दिल्ली, मुंबई ते बिहार, उत्तर प्रदेश आणि देशातील विविध ठिकाणी चालवण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :भारतीय रेल्वेरेल्वे