Join us

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! आता ट्रेनमध्ये प्रवासासाठी द्यावे लागेल कमी भाडे, रेल्वेकडून 'ही' सुविधा पुन्हा सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 12:37 PM

Indian Railway : कोरोना संकटाच्या काळात बंद पडलेल्या अनारक्षित डब्यांमध्ये (Unreserved Coaches) प्रवासाची व्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या निर्णयामुळे आता प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी कमी भाडे मोजावे (Low Train Fare) लागणार आहे. दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बंद पडलेल्या अनारक्षित डब्यांमध्ये (Unreserved Coaches) प्रवासाची व्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

म्हणजेच आता रेल्वेच्या अनारक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट (Advance Tickets) काढण्याची गरज भासणार नाही. पूर्वीप्रमाणेच आता प्रवाशांना अनारक्षित तिकीट (Unreserved Ticket) म्हणजेच ट्रेनचे भाडे कमी (Train Fares Decreased) करून सर्वसाधारण डब्यातून प्रवास करता येणार आहे.

कोरोनामुळे प्रवाशांना अनेक महिने सामान्य डब्यांसाठीही आरक्षण करावे लागले. आता या डब्यांसाठी आरक्षण करण्याची गरज भासणार नाही. यापूर्वी एका झोनमधून दुसऱ्या झोनमध्ये जाणाऱ्या गाड्या केवळ आरक्षणाच्या धर्तीवर धावत होत्या. आता प्रवाशांना सामान्य तिकीट काढूनही सामान्य डब्यात प्रवास करता येणार आहे. मात्र, ही सुविधा 4 महिन्यांसाठी बुक केलेल्या जागांसाठी लागू होणार नाही.

रेल्वेने सांगितले आहे की, ज्या गाड्यांमध्ये आगाऊ तिकीट आरक्षित केले आहे, त्यामध्ये आगाऊ आरक्षणाचा कालावधी संपल्यानंतरच सामान्य व्यवस्था पूर्ववत केली जाईल. मात्र, होळीसाठी धावणाऱ्या गाड्यांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांच्या डब्यात सामान्य तिकीट काढूनही प्रवास करता येणार आहे. यानंतर प्रवाशांना पूर्वीपेक्षा कमी भाडे मोजावे लागेल, असे थेट म्हणता येईल.

होळीनिमित्त विशेष गाड्या धावणाररेल्वेने नुकतीच विशेष गाड्यांची (Special Trains) घोषणा केली होती. देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना रेल्वे प्रवाशांसाठी सातत्याने चांगल्या बातम्या येत आहेत. दरम्यान, धुक्यामुळे रद्द झालेल्या 100 गाड्या  आजपासून रुळांवर धावणार आहेत. यासोबतच 7 मार्च ते 20 मार्च या कालावधीत होळीच्या सणादरम्यान (Holi Festival Special Trains) देशात 250 विशेष गाड्याही चालवण्यात येणार आहेत.

टॅग्स :भारतीय रेल्वेरेल्वे