Lokmat Money > बिझनेस न्यूज > 1 मेपासून तिकीट रिझर्व्हेशनचे नियम बदलणार, प्रवाशांना होणार मोठा फायदा

1 मेपासून तिकीट रिझर्व्हेशनचे नियम बदलणार, प्रवाशांना होणार मोठा फायदा

भारतीय रेल्वेनं प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी एका मोठं पाऊल उचललं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 08:49 AM2019-04-26T08:49:50+5:302019-04-26T08:50:57+5:30

भारतीय रेल्वेनं प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी एका मोठं पाऊल उचललं आहे.

indian railway train ticket booking irctc next generation eticketing system from 1st change boarding station | 1 मेपासून तिकीट रिझर्व्हेशनचे नियम बदलणार, प्रवाशांना होणार मोठा फायदा

1 मेपासून तिकीट रिझर्व्हेशनचे नियम बदलणार, प्रवाशांना होणार मोठा फायदा

नवी दिल्लीः भारतीय रेल्वेनं प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी एका मोठं पाऊल उचललं आहे. जर ट्रेन प्रवासाचं आरक्षण (रिझर्व्हेशन) करताना आपण जे बोर्डिंग स्टेशन निवडलं आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही बदलता येणार आहे. 1 मेपासून हा नवा नियम लागू होणार असून, प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. परंतु यासाठी एक अटही घालण्यात आली आहे. अशी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा रिफंड मिळणार नाही.

येत्या 1 मेपासून रेल्वे तिकिटासंदर्भातील नियम बदलणार आहेत. 1 मेपासून ट्रेनचा चार्ट लागण्याच्या चार तास आधी आपल्याला बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. प्रवासादरम्यान बोर्डिंग स्टेशन बदललं आणि त्यानंतर ते तिकीट रद्द केल्यास त्यावर आपल्याला रिफंड मिळणार नाही. सध्या अशा प्रकारे आरक्षित तिकिटाचं बोर्डिंग स्टेशन बदलता येत नाही. परंतु 1 मेनंतर हे शक्य होणार आहे. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करण्याचा कालावधी 24 तासांवरून 4 तासांवर आणला आहे. 1 मेपासून ट्रेन सुरू होण्याच्या 4 तासांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे.


परंतु एकदा का बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल केल्यास पूर्वीच्या बोर्डिंग स्टेशनवरून ट्रेन पकडता येणार नाही. तरीही प्रवाशानं बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतरही आधीच्याच बोर्डिंग स्टेशनवरून प्रवास केल्यास त्याला दोन्ही स्टेशनांवरच्या तिकिटाचे पैसे मोजावे लागणार आहेत. बोर्डिंग स्टेशनमध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहे. परंतु आय-तिकिटावर आपल्याला ऑनलाइन बोर्डिंग पॉइंट बदलण्याचा पर्याय मिळणार नाही. तात्काळ तिकीट बुक केल्यावरही बोर्डिंग स्टेशन बदलता येणार नाही. 

Web Title: indian railway train ticket booking irctc next generation eticketing system from 1st change boarding station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.