नवी दिल्ली : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात रेल्वेला विक्रमी २.४० लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. आदल्या वर्षाच्या तुलनेत हा महसूल ४९ हजार कोटी रुपयांनी जास्त आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात ६१% वाढ झाली आहे. ३ वर्षांनंतर भारतीय रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा खर्च स्वत: पेलण्यास समर्थ ठरली आहे. महसुलातील वाढ आणि खर्चाचे काटेकारे व्यवस्थापन यामुळे परिचालन गुणोत्तर ९८.१४ टक्के ठेवण्यात रेल्वेला यश आले. सर्व महसुली खर्चाची पूर्तता केल्यानंतर रेल्वेने भांडवली गुंतवणुकीसाठी ३,२०० कोटी रुपये आपल्या अंतर्गत स्रोतातून उभे केले आहेत.रेल्वेला २०२१-२२ या आर्थिक वर्षात १.९१ लाख काेटी रुपयांचे उत्पन्न मिळाले हाेते. त्या आर्थिक वर्षात रेल्वेचा खर्च उत्पन्ना पेक्षा जास्त हाेता. सुमारे २.०६ लाख काेटी रुपयांचा खर्च झाला हाेता. यावेळी मात्र खर्चाच्या तुलनेत उत्पन्न वाढले आहे. यंदा २.३७ लाख काेटी रुपयांचा खर्च झाला आहे. म्हणजेच सुमारे अडीच हजार काेटी रुपयांनी रेल्वे सरप्लसमध्ये आली आहे.
सर्वात वेगवान रेल्वेची गती क्षमतेएवढी नाही !भारताची सर्वांत वेगवान रेल्वे म्हणून लौकिक असलेली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही गाडी ताशी १८० किलोमीटर एवढ्या वेगाने धावू शकते. मात्र, रेल्वे मार्गांच्या वाईट अवस्थेमुळे ही गाडी ताशी सरासरी ८३ किलोमीटर वेगाने धावत आहे. व्यावसायिक सेवांसाठी तिची सर्वोच्च गती ताशी १३० किलोमीटर आहे. गेल्या वर्षी वेग झाला कमीमाहिती अधिकारातून ही माहिती मिळाली आहे. त्यानुसार, २०२१-२२ मध्ये वंदे भारतचा सरासरी वेग ताशी ८४.४८ किलोमीटर तसेच २०२२-२३ मधील सरासरी वेग ताशी ८१.३८ किलोमीटर राहिला.१८०च्या वेगाने धावणे अशक्यअधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा रेल्वेचा वेग हा रेल्वे मार्गाच्या स्थितीवर अवलंबून असतो. सर्वोच्च वेगाने संपूर्ण मार्गात धावू शकत नाही, हे समजून घ्यायला हवे.नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत सर्वाधिक वेगवान असून ताशी ९५ किमी सरासरी वेगाने धावते. ही देशातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे.रानी कमलापती-हजरत निजामुद्दीन वंदे भारत दुसऱ्या स्थानी. ताशी ९४ किमी सरासरी वेगराजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा वंदे भारतचा वेग जास्त आहे. आग्रा कॅंट आणि तुगलकाबाद या सेक्शनमध्ये ही गाडी ताशी १६० किमी वेगने धावते.मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग सर्वात कमी आहे. ही गाडी ताशी ६४ किमी सरासरी वेगाने धावते.