नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. देशात सातत्याने कमी होत असलेल्या कोरोना प्रकरणानंतर डीजीसीएने (DGCA) 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, रेल्वे मंत्रालयाने बर्याच दिवसांनी रेल्वे गाड्यांमध्ये अनारक्षित डबे जोडण्याबाबत म्हटले आहे.
23 मार्च 2020 नंतर आता सुरू होणाररेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवाशांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे. खरंतर, मार्च 2020 मध्ये, देशातील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना 23 मार्च 2020 पासून ट्रेनमधून अनारक्षित डबे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, अनारक्षित डबे जोडल्यानंतर आता प्रवाशांना आरक्षण तिकीट बुक केल्याशिवाय प्रवास करता येणार असून, त्यामुळे प्रवासाचा खर्च कमी होणार आहे.
प्रवासी खिडकीतून तिकिट काढतील या बदलानंतर प्रवासी रेल्वे स्थानकात जाऊन खिडकीतून (विंडो) तिकीट काढतील आणि ते त्यांच्या इच्छित स्थळी रवाना होऊ शकतील. ही सुविधा सुरू केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणे सवलत मिळू शकेल, असे मानले जात आहे. तसेच, आता पूर्वीपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
अनेक रेल्वेगाड्या सुरूदरम्यान, गेल्या डिसेंबरमध्ये वाढत्या थंडी आणि धुक्यामुळे उत्तर प्रदेश (UP), बिहार (Bihar), मध्यप्रदेश (MP) आणि झारखंडला (Jharkhand) जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता 1 मार्चपासून या गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे या मार्गावरील कोट्यवधी प्रवाशांना फायदा होणार आहे.