रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आता रेल्वे प्रवाशांना तिकिट कन्फर्म करण्यासाठी त्रास होणार नाही. एवढेच नाही, तर त्यांना चालत्या ट्रेनमध्ये वेटिंग (Waiting) अथवा आरएसी (RAC) तिकीट कंफर्म करण्यासाठी टीटीला विनंतीही करावी लागणार नाही. रेल्वे मंत्रालयाच्या (Ministry of Railways) या एका निर्णयामुळे ट्रेनने वेटिंग (विंडो टिकट) आणि आरएसी तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खरे तर रेल्वे विभाग प्रिमियम, मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या टीटींना हॅन्ड हेल्ड टर्मिनल-एचएचटी (Hand Held Terminal Device) देणार आहे. रेल्वेने याची सुरुवातही केली आहे. या एचएचटी डिव्हाइसमुळे रिकामे बर्थ, वेटिंग अथवा आरएसी, नंबर आणि श्रेणीनुसार, अपोआप कन्फर्म होत जातील.
रेल्वेचा मोठा निर्णय -
तत्पूर्वी, भारतीय रेल्वेने पायलट प्रोजेक्ट अंतर्गत काही प्रीमियम रेल्वे गाड्यांमध्ये (राजधानी, शताब्दी) टीटींना एचएचटी डिव्हाइस दिले होते. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. यामुळे, वेटिंग अथवा आरएसी तिकिट चार्ट तयार झाल्यानंतर, चालत्या ट्रेनमध्येच अपोआप कन्फर्म झाले. तसेच संबंधितांना मेसेजही पोहोचले. यानंतर आता भारतीय रेल्वेने 559 रेल्वे गाड्यांमध्ये टीटींना 5850 एचएचटी डिव्हाइस दिले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हळू-हळू प्रिमियम लेल्वेंसह सर्वच मेल एक्सप्रेससाठी हे डिव्हाइस देण्यात येईल.
रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात ट्रेनचे 523604 रिझर्व्हेशन झाले, याच चालत्या ट्रेनमध्ये 242825 तिकिटांची तपासणी एचएचटी डिव्हाइसच्या माध्यमाने करण्यात आली. यांत 18 हजारहून अधिक आरएसी आणि नऊ हजारहून अधिक वेटिंग तिकिट कन्फर्म झाले. रेल्वे मंत्रालयनुसार, सामान्य दिवसांत रोज 12.5 लाख रिझर्व्हेशन होतात. अशात, मेल आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये एचएचटी डिव्हाइसच्या माध्यमाने तिकिटांची तपासणी केली गेली तर, कन्फर्म होणाऱ्या तिकिटांचा आकडा वाढेल.