आपण ट्रेनने नियमित प्रवास करत असाल, तर ही बातमी आपल्यासाठी आहे. कारण, रेल्वे मंत्रालयाने (Indian Railways) प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रीमियम ट्रेनमध्ये आकारले जाणारे सेवा शुल्क (Service Charge) रद्द केले आहे.
यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC) परिपत्रकही जारी केले आहे. हा नियम लागू होण्यापूर्वी, IRCTC ट्रेनने प्रवास करताना खाण्यापिण्याची ऑर्डर देण्यासाठी 50 रुपये सेवा शुल्क आकारत होते.
या नव्या नियमानुसार, आता ज्या प्रवाशांनी तिकिट बुकिंग करताना खाण्याचे ऑप्शन निवडले नाही, त्यांना सर्व्हिस चार्जपासून सूट मिळेल. यामुळे आता त्यांना चहा-पाणी आहे त्या किंमतीतच मिळेल. मात्र, त्यांना नाश्ता आणि जेवन मागविल्यास सर्व्हिस चार्ज म्हणून 50 रुपये अधिकचे द्यावे लागतील. राजधानी, दुरंतो, शताब्दी आणि वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 50 रुपये सर्व्हिसचार्ज लागत होता.