नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठी खुशखबर दिली आहे. आता ट्रेनमध्ये आरक्षणादरम्यान प्रवाशांना कन्फर्म सीट मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता रेल्वेने 75 गाड्यांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि सणांमध्ये ट्रेनचे तिकीट बुक करताना बहुतेक वेळा सीट्स आधीच फुल होतात. अशा परिस्थितीत तिकीट बुकिंग दरम्यान लोकांना जागा मिळत नाही. यासोबतच या काळात तत्काळ तिकीट बुक करणे अवघड होऊन बसते. काउंटर उघडताच काही मिनिटांतच सीट्स बुक होतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने अनेक गाड्यांमधील डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वे तिकीट बुक करताना सीट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त वाढणार आहे. हे पाहता, उत्तर पश्चिम रेल्वेने एकूण 72 गाड्यांमध्ये 81 डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहिल्ला-जोधपूर-दिल्ली सराय रोहिल्ला ट्रेनमध्ये 1 मे ते 1 जून 2022 पर्यंत 2 थर्ड एसी आणि 2 सेकंड स्लीपर क्लास कोचच्या संख्येत तात्पुरती वाढ करण्यात आली आहे. जोधपूर-वांद्रे टर्मिनस-जोधपूर ट्रेनमध्ये 4 मे ते 3 जून 2022 या कालावधीत डब्यांची संख्या तात्पुरती वाढवली जात आहे. यामध्ये 2 थर्ड एसी आणि 2 सेकंड स्लीपर क्लास डब्बे वाढवण्यात येणार आहेत. बिकानेर-दिल्ली सराय रोहिला-बिकानेर या ट्रेनच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये 1 मे ते 2 जून दरम्यान तात्पुरती वाढ करण्यात आली आहे. यामध्ये 2 सेकंड स्लीपर क्लास डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
दुसरीकडे, भिवानी-कानपूर-भिवानी या दोन्ही फेऱ्यांमध्ये 1 मे ते 1 जून दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यामध्ये एक थर्ड एसी आणि एक सेकंड स्लीपर क्लास डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहेत. सराय रोहिल्ला-उदयपूर शहर-दिल्ली सराय रोहिल्ला, या ट्रेनमध्ये 1 मे ते 1 जून या कालावधीत 2 सेकंड स्लीपर क्लास डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. उदयपूर शहर-खजुराहो-उदयपूर शहरामध्ये 1 मे ते 3 जूनपर्यंत थर्ड एसी आणि 1 सेकंड स्लीपर क्लास डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. याचप्रमाणे अजमेर-दादर-अजमेर या ट्रेनमध्ये 1 मे ते 30 मे दरम्यान थर्ड एसी डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. कोठी-दादर-भगत की कोठी ट्रेनमध्ये 2 मे ते 31 मे या कालावधीत 3 थर्ड एसी कोच आणि 3 सेकंड स्लीपर क्लास डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.