Join us

Indian Railways : तुमची ट्रेन कधीही सुटणार नाही! 'या' रेल्वे नियमाचा खूप होतो उपयोग, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 1:59 PM

Indian Railways : प्रवाशांची सोय लक्षात घेऊन बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा आयआरसीटीसीकडून देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : तुम्हीही सतत ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अनेकवेळा अशी परिस्थिती येते की, मूळ स्थानकाऐवजी दुसऱ्या स्थानकावरून ट्रेन पकडावी लागते. म्हणजेच अनेक वेळा तुम्ही ज्या स्थानकावरून तिकीट काढले आहे, त्याठिकाणी भौगोलिकदृष्ट्या तुम्ही नसता पण काही कारणास्तव तुम्ही त्या स्थानकाच्या जवळ असता. अशा परिस्थितीत, तुम्हाला भीती वाटते की टीटी तुमचे तिकीट रद्द करेल.

या स्थितीत तुम्ही बोर्डिंग स्टेशन बदलून तिकीट रद्द करण्यासोबतच कोणत्याही प्रकारचा दंड टाळू शकता. काही वेळा अचानक बोर्डिंग स्टेशन बदलावे लागते. बोर्डिंग स्टेशन प्रवाशांच्या आवाक्याबाहेर असल्याने ट्रेन चुकण्याची भीती असते. अशा परिस्थितीत, प्रवासी जवळच्या स्थानकावरून त्यांचे बोर्डिंग स्टेशन रिव्हाइज करू शकतात.

प्रवाशांची सोय लक्षात घेऊन बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा आयआरसीटीसीकडून देण्यात आली आहे. आयआरसीटीसीची ही सुविधा ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट बुक केले आहे, त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. ट्रॅव्हल एजंट किंवा प्रवासी आरक्षण प्रणालीद्वारे तिकीट बुक करणाऱ्यांवर ही सुविधा काम करणार नाही. ज्या प्रवाशांना त्यांचे बोर्डिंग स्टेशन बदलायचे आहे, त्यांना ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी ऑनलाइन बदल करावे लागतील. आयआरसीटीसी वेबसाइटनुसार, एकदा प्रवाशाने त्याचे बोर्डिंग स्टेशन बदलले की, तो मूळ बोर्डिंग स्टेशनवरून ट्रेन पकडू शकत नाही.

बोर्डिंग स्टेशन बदलण्याची पद्धतजर प्रवाशाने बोर्डिंग स्टेशन न बदलता दुसऱ्या स्थानकावरून ट्रेन पकडली तर दंडासोबतच बोर्डिंग पॉईंट आणि सुधारित बोर्डिंग पॉइंट दरम्यानचे भाडेही भरावे लागेल. नियमांनुसार, बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल एकदाच केला जाऊ शकतो, त्यामुळे बदल करण्यापूर्वी पूर्णपणे खात्री करा. चला जाणून घेऊया बोर्डिंग स्टेशन कसे बदलावे...

ऑनलाइन कसे बदलावे बोर्डिंग स्टेशन- पहिल्यांदा तुम्ही आयआरसीटीच्या अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in/nget/train-search वर जा.- लॉगिन आणि पासवर्ड सेलेक्ट करुन 'Booking Ticket History' मध्ये जा.- येथे तुमची ट्रेन निवडा आणि 'change boarding point' वर जा.- नवीन वेब पेज ओपन झाल्यावर ड्रॉप डाउनमध्ये संबंधित ट्रेनसाठी नवीन बोर्डिंग स्टेशन निवडा.- नवीन स्टेशन सिलेक्ट केल्यानंतर सिस्टम कंफर्मेशनसाठी विचारले जाईल, त्यानंतर 'OK' वर क्लिक करा.- यानंतर तुमच्या मोबाईलवर बोर्डिंग स्टेशन बदलण्याचा एसएमएस येईल.

टॅग्स :रेल्वेरेल्वे प्रवासीभारतीय रेल्वे