Lokmat Money > बिझनेस न्यूज > Indian Railways : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! आता चालत्या ट्रेनमध्ये कार्डने पेमेंट करून बनवता येईल तिकीट

Indian Railways : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! आता चालत्या ट्रेनमध्ये कार्डने पेमेंट करून बनवता येईल तिकीट

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांकडे पॉइंट ऑफ सेलिंग अर्थात पीओएस मशीनमध्ये 2G सिम आहे. यामुळे अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या येते. आता रेल्वेने आपल्या स्टाफकडील हँडहेड टर्मिनल सारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समध्ये 4G सिम टाकायला सुरूवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 04:05 PM2022-07-23T16:05:49+5:302022-07-23T16:06:48+5:30

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांकडे पॉइंट ऑफ सेलिंग अर्थात पीओएस मशीनमध्ये 2G सिम आहे. यामुळे अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या येते. आता रेल्वेने आपल्या स्टाफकडील हँडहेड टर्मिनल सारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समध्ये 4G सिम टाकायला सुरूवात केली आहे.

Indian Railways Important news for the railway passengers tickets through debit card moving trains railway to introduce 4g technology to pos machine | Indian Railways : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! आता चालत्या ट्रेनमध्ये कार्डने पेमेंट करून बनवता येईल तिकीट

Indian Railways : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! आता चालत्या ट्रेनमध्ये कार्डने पेमेंट करून बनवता येईल तिकीट

रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुविधेसाठी सातत्याने बदल करत असते. यातच आता रेल्वेने एक नवे पाऊल उचलले आहे. यामुळे आता प्रवाशांना ट्रेनमध्येही भाडे अथवा दंड डेबिट कार्डच्या माध्यमाने भरता येणार आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चांगल्या पद्धतीने चालावीत म्हणून रेल्वे ती 4G ने जोडत आहे. सध्या या उपकरणांत 2G सीम असल्याने समस्या निर्माण होत आहेत.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांकडे पॉइंट ऑफ सेलिंग अर्थात पीओएस मशीनमध्ये 2G सिम आहे. यामुळे अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या येते. आता रेल्वेने आपल्या स्टाफकडील हँडहेड टर्मिनल सारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समध्ये 4G सिम टाकायला सुरूवात केली आहे. असे झाल्यानंतर, रेल्वे प्रवासी दंड अथवा भाडे रोख देण्याऐवजी ऑनलाईनही देऊ शकतात.

रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील 36 हजारहून अधिक ट्रेनमध्ये टीटींना पॉइंट ऑफ सेल मशीन देण्यात आले आहे. या उद्देश बिना तिकीट प्रवास करणाऱ्यांना अथवा स्लिपरचे तिकीट काढून एसीने प्रवास करणाऱ्यांना अधिकच्या देय रकमेसाठी हातो-हात तिकीट बनवून देणे आहे. या मशीन्सच्या माध्यमाने टीटी स्लीपर अथवा एसीच्या भाड्यातील अंतर काढून अॅक्सेस शेअरचे तिकीट बनवू शकतात.

राजधानी, शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांमधील टीटी कंडक्टरना हॅन्डहेल्ड उपकरणे आधीच पुरविण्यात आली आहेत. या महिन्यापासून मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या टीटींनाही हे मशिन्स दिली जात आहेत. त्यासाठी त्यांना विशेष कार्यशाळेद्वारे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. येत्या काही महिन्यांत या मशिन्समध्ये 4G नेटवर्क सिम बसवल्यास त्यांना चालवताना कोणतीही अडचण येणार नाही, असे रेल्वेने म्हटले आहे.

Web Title: Indian Railways Important news for the railway passengers tickets through debit card moving trains railway to introduce 4g technology to pos machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.