Join us

Indian Railways : रेल्वेच्या प्रवासी भाड्यात होणार वाढ; पाहा, कोणत्या शहरासाठी किती रुपये मोजावे लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 12:16 PM

Indian Railways : आता केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. ज्यांचे आरक्षण नाही त्यांना या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही.

ठळक मुद्दे6 जानेवारीपासून या गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मैलानी ते गोरखपूर या मार्गावर रेल्वे चालविण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.

 नवी दिल्ली : कोरोना संकट काळात बंद असलेल्या ट्रेन पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वेने सराव सुरू केला आहे. मात्र, काही गाड्या ट्रायल म्हणून चालवल्या जात आहेत. जर प्रवाश्यांनी या गाड्यांमध्ये प्रवास केल्यास त्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण भारतीय रेल्वेने भाडे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, आता केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. ज्यांचे आरक्षण नाही त्यांना या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही.

22 मार्चपासून गाड्या बंद आहेत6 जानेवारीपासून या गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मैलानी ते गोरखपूर या मार्गावर रेल्वे चालविण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. 22 मार्च 2020 पासून या गाड्या बंद आहेत. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने आरक्षण अनिवार्य केले आहे.

आरक्षण ऑनलाइन करता येतेप्रवाशाला प्रवास करण्याच्या कोणत्याही अंतरासाठी आरक्षण आवश्यक आहे. याशिवाय, ट्रेन येण्यापूर्वी अर्धा तास आधी तिकिट खिडकी उघडली जाईल आणि येथेही प्रवाशांना आरक्षणाचे तिकीट मिळेल. तसेच, प्रवासी सुद्धा ऑनलाईन आरक्षण करू शकतात.

आता किती भाडे असेल...>> मैलानी जंक्शन ते लखीमपूर - आधी 40 रुपये, आता 55 रुपये>> मैलानी जंक्शन ते हरगाव - आधी 45 रुपये, आता 60 रुपये>> मैलानी जंक्शन ते सीतापूर - आधी 55 रुपये, आता 70 रुपये>> मैलानी जंक्शन ते लखनौ जंक्शन - आधी 75 रुपये, आता 90 रुपये>> मैलानी जंक्शन ते गोरखपूर - आधी 175 रुपये आणि आता 190 रुपये(नोट- या सर्व तिकिट दरामध्ये आरक्षण शुल्क 15 समाविष्ट आहे.)

या शहरांसाठीही गाड्यांचे परिचालन सुरूरेल्वेने जम्मू-काश्मीर आणि उधमपूरसाठी नवीन गाड्या चालवण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच, आता आपल्याला या मार्गावर जाण्यासाठी त्रास होणार नाही. या मार्गावर गाडी चालवण्याचा सर्वाधिक फायदा पटना, दुर्ग, वाराणसी, अजमेर आणि नवी दिल्लीच्या प्रवाशांना होणार आहे.

या गाड्या १ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहतील>> वाराणसी ते जम्मू ते जम्मू (02237/02238) दररोज चालविण्यात येतील.>> अर्चना सुपरफास्ट (02355/02356) दर रविवारी आणि बुधवारी सकाळी ऑपरेट केले जाईल.>>  श्री शक्ती (02461/62) नवी दिल्ली ते कटरा पर्यंत चालविली जाईल. 

टॅग्स :भारतीय रेल्वेरेल्वेरेल्वे प्रवासी