नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून वेळोवेळी अनेक नियम बदलले जातात. तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी या नियमांबद्दल अपडेट असणे महत्त्वाचे आहे. आता पुन्हा एकदा रेल्वेने प्रवासाच्या नियमात बदल केला आहे.
दरम्यान, रेल्वेने केलेले हे नियम रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू होणार आहेत. रात्रीच्या वेळी प्रवास (Night Journey) करणाऱ्यांना सहप्रवाशांमुळे झोपेचा त्रास होत असल्याच्या तक्रारी अनेकदा रेल्वे बोर्डाकडे येत होत्या. हे लक्षात घेऊन प्रवाशांच्या झोपेचा त्रास होऊ नये म्हणून नियमात बदल करण्यात आला आहे.
नवीन नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, तुमच्या आजूबाजूला कोणीही सहप्रवासी (Train Passenger) मोबाईलवर मोठ्याने बोलू शकणार नाही किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही. प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर रेल्वे अशा लोकांवर कारवाई करेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
या नियमानुसार प्रवाशांच्या वतीने तक्रार आल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाऊन समस्या सोडवावी लागणार आहे. तक्रारीचे निराकरण न झाल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांची जबाबदारी असेल. सर्व झोनला हे नियम तातडीने लागू करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) दिले आहेत.
सतत प्रवाशांकडून मिळणाऱ्या तक्रारीअनेकदा प्रवासी शेजारच्या सीटवर उपस्थित असलेल्या प्रवाशाच्या मोबाईलवर मोठ्याने बोलत असल्याची किंवा गाणी ऐकत असल्याची तक्रार करत असत. याशिवाय रात्रीच्या वेळी काही मंडळी जोरजोरात बोलत असल्याच्याही तक्रार येत होत्या. गस्तीदरम्यान रेल्वेचे स्कॉर्ट किंवा मेंटेनन्स कर्मचारी मोठ-मोठ्याने बोलतात तेव्हाही अशी प्रकरणे निदर्शनास आली. त्यामुळे प्रवाशांच्या झोपेचाही त्रास होतो. रात्री दिवे लावण्यावरून अनेकदा वाद होत होते.
रात्री 10 वाजल्यानंतर हा नियम लागू होणार- कोणताही प्रवासी मोठ्याने बोलणार नाही किंवा मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणार नाही.- रात्रीच्या वेळी सहप्रवाशाच्या झोपेचा त्रास होऊ नये, यासाठी रात्रीचे दिवे सोडून इतर सर्व दिवे बंद करावे लागतील.- ग्रुपमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत ट्रेनमध्ये गप्पा मारता येणार नाही. सहप्रवाशाच्या तक्रारीनंतर कारवाई होऊ शकते.- चेकिंग कर्मचारी, आरपीएफ, इलेक्ट्रिशियन, केटरिंग कर्मचारी आणि देखभाल कर्मचारी रात्री शांततेने काम करतील.- रेल्वे कर्मचारी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना, दिव्यांग आणि एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना तात्काळ मदत करतील.