Join us

Indian Railways : दिवसाला फक्त 1 हजार रुपयांत तीर्थक्षेत्रांची यात्रा! लोकल ट्रान्सपोर्ट देखील मोफत, IRCTC ची शानदार ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 6:53 PM

Bharat Darshan Special Tourist train route : ही ट्रेन उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील अनेक शहरांमधून जाणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने (IRCTC)बुकिंगही सुरू केले आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railways) तीर्थक्षेत्रांना  भेट देण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (Indian Railway Catering and Tourism Corporation) श्री राम जन्मस्थानापासून पुरी आणि गंगासागरपर्यंतच्या प्रवासासाठी एक अप्रतिम पॅकेज आणले आहे. रेल्वेकडून भारत दर्शन स्पेशल टुरिस्ट ट्रेन (Bharat Darshan Special Tourist Train) चालवली जाणार आहे. ही ट्रेन उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील अनेक शहरांमधून जाणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने (IRCTC)बुकिंगही सुरू केले आहे.

ट्रेन कोण-कोणत्या ठिकाणी जाणार?आयआरसीटीसी विविध धार्मिक स्थळांसाठी सतत पॅकेजेस लाँच करत आहे. आयआरसीटीसीच्या या पॅकेजमध्ये श्री रामजन्म भूमी दर्शन, पुरी, गंगासागरची यात्रा केली जाणार आहे. याशिवाय ही ट्रेन यात्रेकरूंना अयोध्या, वाराणसी, बैद्यनाथ, गंगासागर, पुरी, कोणार्क, गया आणि कोलकाता येथील धार्मिक स्थळांवर घेऊन जाईल.

आयआरसीटीसीचे शानदार पॅकेज- आयआरसीटीसीचे हे विशेष पॅकेज 9 रात्री 10 दिवसांचे असेल.- या अंतर्गत लोक फक्त 1 हजार रुपयांमध्ये दररोज प्रवास करू शकतात.- हे संपूर्ण पॅकेज 9450 रुपयांचे आहे.- याअंतर्गत स्लीपर क्लासमध्ये प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.- ही विशेष ट्रेन आग्रा येथून सुरू होईल.- इतर अनेक शहरांमधूनही या ट्रेनमध्ये चढण्याचा आणि उतरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.- प्रवाशांच्या सोयीनुसार यामध्ये ग्वाल्हेर, झाशी, ओराई, कानपूर, लखनौ, बाराबंकी आणि अयोध्या यांचा समावेश आहे. लोक त्यांच्या सोयीनुसार ट्रेनमध्ये चढण्याची आणि उतरण्याची जागा निवडू शकतात.- या पॅकेजमध्ये ट्रेनच्या भाड्यासोबत ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरचा समावेश असेल.- या पॅकेजमध्ये स्थानिक वाहतूक आणि मार्गदर्शक शुल्काचाही समावेश करण्यात आला आहे.- ही ट्रेन 22 मार्चला सुटेल आणि 31 मार्चला प्रवास संपेल.

टॅग्स :आयआरसीटीसीरेल्वे