Join us

रेल्वे प्रवासी आज रात्री साडेतीन तास ऑनलाइन तिकीट काढू शकणार नाहीत; या सेवाही बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 6:06 PM

IRCTC ALERT: रेल्वे स्थानकांवर तिकीट काउंटरवरून होणाऱ्या बुकिंगवरही याचा परिणाम होणार आहे. तसेच, यादरम्यान तिकीटही रद्द केले जाणार नाही.

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासी (Railway Passenger) आज रात्री साडेतीन तास ऑनलाइन तिकीट (Online Ticket) काढू शकणार नाहीत. भारतीय रेल्वेने तांत्रिक देखभालीसाठी प्रवासी आरक्षण प्रणाली (Passenger Reservation System) तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय ऑनलाइन बुक केलेल्या रेल्वेच्या विविध सेवांवरही यादरम्यान परिणाम होणार आहे.

प्रवासी आरक्षण प्रणाली बंद झाल्यामुळे पूर्व रेल्वे, साउथ इस्टर्न रेल्वे, ईस्ट कोस्ट रेल्वे, साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वे, नार्थ ईस्ट फंट्रियर रेल्वेवर परिणाम होईल. रेल्वे स्थानकांवर तिकीट काउंटरवरून होणाऱ्या बुकिंगवरही याचा परिणाम होणार आहे. तसेच, यादरम्यान तिकीटही रद्द केले जाणार नाही. रात्री 12 नंतर सुरू होणाऱ्या गाड्यांचे चार्ट सुद्धा वेळेआधी तयार केले जातील.

रात्री 11.45 ते 2.30 पर्यंत सेवा बंद राहणार रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, 26 एप्रिल रोजी रात्री 11.45 वाजल्यापासून कोलकाता येथील रेल्वे डेटा सेंटरमध्ये देखभालीचे काम केले जाणार आहे. ते रात्री अडीच वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या काळात रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवेवर परिणाम होणार आहे. यादरम्यान रेल्वे प्रवासी तिकीट काउंटरवरूनही बुकिंग करू शकणार नाहीत.

'या' सेवांवरही परिणाम होणारदेखभाल दुरुस्तीच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांना ऑनलाइन चौकशी, रिटायरिंग रूम सर्व्हिसचे बुकिंग करता येणार नाही. याशिवाय ट्रेनशी संबंधित माहिती कॉल सेंटर आणि दूरध्वनी क्रमांक-139 द्वारे देखील उपलब्ध होणार नाही. तसेच, यावेळी रेल्वे प्रवाशांना IVRS, टच स्क्रीनच्या माध्यमातून कोणतीही माहिती मिळू शकणार नाही.

टॅग्स :रेल्वेभारतीय रेल्वेआयआरसीटीसी