Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता IRCTC द्वारे तिकीट बुकिंग करणे झाले सोपे; जाणून घ्या काय आहे सुविधा? 

आता IRCTC द्वारे तिकीट बुकिंग करणे झाले सोपे; जाणून घ्या काय आहे सुविधा? 

आयआरसीटीसीने एक अशी सेवा सुरू केली आहे, जी व्यक्तीला अधिकृत चॅटबॉटद्वारे तिकिटांचे बुकिंग करण्यास परवानगी देते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 05:42 PM2022-09-18T17:42:03+5:302022-09-18T17:43:59+5:30

आयआरसीटीसीने एक अशी सेवा सुरू केली आहे, जी व्यक्तीला अधिकृत चॅटबॉटद्वारे तिकिटांचे बुकिंग करण्यास परवानगी देते.

Indian Railways Irctc Want To Go Home On The Festival Now Booking Tickets Through Irctc Is Easy | आता IRCTC द्वारे तिकीट बुकिंग करणे झाले सोपे; जाणून घ्या काय आहे सुविधा? 

आता IRCTC द्वारे तिकीट बुकिंग करणे झाले सोपे; जाणून घ्या काय आहे सुविधा? 

नवी दिल्ली : फेस्टिव्हल सीजन सुरू होत आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही घरी जाण्याचा निर्णय घेतला असेल आणि कन्फर्म तिकीट मिळत नसेल, तर आता तुम्ही  इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) वेबसाइटवर जाऊन सहज तिकीट बुक करू शकता. तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ झाली आहे. आयआरसीटीसीने एक अशी सेवा सुरू केली आहे, जी व्यक्तीला अधिकृत चॅटबॉटद्वारे तिकिटांचे बुकिंग करण्यास परवानगी देते.

भारतीय रेल्वेने ऑक्टोबर 2018 मध्ये आस्क दिशा नावाचा AI-powered चॅटबॉट लाँच केला. दिशा म्हणजे डिजिटल इंटरेक्शन टू सीक हेल्प एनीटाइम आहे. याअंतर्गत तिकीट बुकिंगपासून ग्राहकांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. तसेच, चॅटबॉट वापरून प्रवासी आपल्या प्रवासासाठी रिझर्व्हेशन सुद्धा करू शकतील.

चॅटबॉटद्वारे रिझर्व्हेशन करून प्रवासी स्वत:ला आयआरसीटीसी वेबसाइटला भेट देण्याचा किंवा अॅप्लिकेशन वापरण्याचा त्रास वाचवू शकतील. आकडेवारीनुसार, दररोज 10 लाखांहून अधिक लोक आयआरसीटीसी वेबसाइटला भेट देतात. या मोठ्या संख्येमुळे रेल्वे स्थानकांवरून तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

जर एखादा प्रवासी UPI द्वारे पैसे भरत असेल, तर आयआरसीटीसी स्लीपर क्लाससाठी 10 रुपये अधिक आणि एसी बर्थसाठी 15 रुपये अधिक आकारेल. जर पेमेंट इतर कोणत्याही पेमेंट ऑप्शनद्वारे केले असेल, तर भारतीय रेल्वे स्लीपर क्लाससाठी 20 रुपये अतिरिक्त आणि एसी क्लाससाठी 30 अतिरिक्त शुल्क आकारेल. दरम्यान, नुकतीच भारतीय रेल्वेने एक सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत रेल्वे प्रवाशांना व्हॉट्सअॅपवरून जेवण ऑर्डर करण्याची परवानगी देते. या सुविधेचा वापर करून, प्रवासी आपल्या बर्थवर सहज  जेवण मिळवू शकतो.

Web Title: Indian Railways Irctc Want To Go Home On The Festival Now Booking Tickets Through Irctc Is Easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.